22 September 2019 2:00 PM
अँप डाउनलोड

भारत वेस्ट इंडिज कसोटी मालिका; यजमानांना व्हाईटवॉश

Indian Cricket Team, West Indies Cricket Team, BCCI, ICC International Cricket

टी-२०, वन-डे पाठोपाठ विराट कोहलीच्या भारतीय संघाने जेसन होल्डरच्या वेस्ट इंडिज संघावर कसोटी मालिकेतही निर्विवाद वर्चस्व मिळवलं आहे. अँटीग्वा कसोटीत बाजी मारल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी जमैका कसोटीतही विंडीजला झटपट गुंडाळत सामना आपल्या खिशात घातला. भारतीय संघाने कसोटीत २५७ धावांनी बाजी मारत मालिकेत २-० अशी सरशी साधली. पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावणाऱ्या हनुमा विहारीची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. दुसऱ्या डावात भारताकडून मोहम्मद शमी आणि रविंद्र जाडेजा यांनी प्रत्येकी ३-३ बळी घेतले.

हनुमा विहारीच्या कारकीर्दीतील पहिल्या शतकी खेळीनंतर जसप्रीत बुमराहच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपदमध्ये दुसऱ्या कसोटीत तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडीजचा पहिला डाव ४७.१ षटकात ११७ धावांत गुंडाळला. त्यामुळे भारताने तब्बल २९९ धावांची भलीमोठी आघाडी घेत सामन्यावर घट्ट पकड मिळवली. त्यानंतर, फलंदाजीस आलेल्या टीम इंडियाने १६८ धावांवर ४ गडी बाद असताना डाव घोषित केला. त्यामुळे वेस्ट इंडिजला ४६७ धावांचे लक्ष्य पार देण्यात आले होते.

मराठी विवाह II अनुरूप मराठी वधू - वर मोफत ऑनलाईन नोंदणी

हॅशटॅग्स

#Indian Cricket Team(58)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या