26 April 2024 3:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

T20 WC 2020 Ind Vs Aus : ऑस्ट्रेलियाचे लोटांगण; भारताची विजयी सलामी

ICC Womens T20 World Cup

सिडनी: पूनम यादवच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कपमधील पहिल्याच सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा १७ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत भारताने ऑस्ट्रेलियाला १३३ धावांचे लक्ष्य दिले होते. पण गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा ११५ धावांवर ऑल आऊट केला.

अनुभवी फिरकीपटू पूनम यादव हिच्या चार बळींच्या जोरावर भारताने यजमान ऑस्ट्रेलियाला धावांनी पराभूत केले. जेमायमा रॉड्रीग्ज (२६) आणि दिप्ती शर्मा (४९*) या दोघींच्या भागीदारीच्या जोरावर भारताने २० षटकात ४ बाद १३२ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला १३३ धावांचे आव्हान दिले. आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर हेली हिने अर्धशतकी केली, पण पूनम यादवच्या फिरकीपुढे यजमान ऑस्ट्रेलियाने गुडघे टेकले. या विजयासह भारताने स्पर्धेत विजयी सलामी दिली.

भारतीय महिलांनी दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केली. मात्र पूनम यादवच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियन महिला फलंदाजांचा निभाव लागला नाही. तिने चार षटकात १७ धावा खर्च करत चार विकेट घेत भारताच्या हातून निसटलेला सामना भारताच्या बाजूने वळवला. ऑस्ट्रेलियाकडून सलामीची फलंदाज एलिसा हिली (५१) आणि अ‍ॅश्ले गार्डनरने ३४ धावा केल्या. त्यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणालाही समाधानकारक खेळी करता आली नाही. भारताकडून पूनम यादवने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. शिखा पांडेला तीन तर राजेश्वरी गायकवाडला एक विकेट मिळाली.

 

Web Title: Story India beat defending champions Australia by 17 runs in the opening match of ICC Womens T20 World Cup at Sydney.

हॅशटॅग्स

#Indian Cricket Team(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x