22 September 2019 1:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

भाजपमधील विरोधानंतर अब्दुल सत्तारांनी अखेर शिवबंधन बांधलं

MLA Abdul Sattar, Congress, Shivsena, Uddhav Thackeray

मुंबई : काँग्रेसमधून बाहेर पडलेले माजी आमदार अब्दुल सत्तार यांनी अखेर शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे. सत्तार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सोमवारी मातोश्री या निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून सत्तार भाजपात जाणार असल्याची चर्चा होती. मात्र ऐनवेळी त्यांनी शिवबंधन बांधले.

लोकसभा निवडणुकीपासून आ.सत्तार यांना भाजपमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. त्या अनुषंगाने त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या माध्यमातून दोन वेळा मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली. परंतु त्यांचा भाजप प्रवेश अनिश्चित राहिला. महाजनादेश यात्रेत तरी मुख्यमंत्री आपल्याला भाजपात प्रवेश देण्याबाबत निर्णय घेतील, असे आ. सत्तार यांना वाटले होते. परंतु सत्तार यांना फक्त यात्रेतील रथात मुख्यमंत्र्यांसोबत उभे राहण्याची संधी मिळाली. सिल्लोड भाजपचा सत्तार यांना कडाडून असलेला विरोधच त्यांच्या प्रवेशाच्या आड येत असल्याचे कळते. दरम्यान, या टोलवा-टोलवीला कंटाळून सत्तार यांनी शिवबंधन बांधण्याचे निश्चित केले.

मागील ५ वर्षांपासून शेतकऱ्यांच्या पीकविमा, कर्जमाफी अशा विविध प्रश्नांवर शिवसेना राज्यात चांगले काम करत आहे. खरे तर मी काँग्रेसमध्ये असताना शेतकऱ्यांसाठी लढणे ही आमची जबाबदारी होती. मात्र ती जबाबदारी सत्तेत असूनही शिवसेना पार पाडलेली आहे, अशा शब्दांत सत्तार यांनी शिवसेनेचा गौरव केला. शिवसेनेच्या या कामगिरीमुळे प्रभावित होत आपण शिवसेनेत प्रवेश केला असल्याचेही ते म्हणाले.

अनुरूप मराठी वधू - वर मोफत ऑनलाईन नोंदणी

हॅशटॅग्स

#Congress(253)#Shivsena(570)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या