4 May 2024 12:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

सातारा | अनुदानावर १० शेळ्या-एक बोकड, दोन गाई म्हशी आणि मिल्किंग मशीनच वाटप | करा अर्ज

Pashusanvardhan vibhag

मुंबई, २३ जून | जिल्हा परिषद योजना 2021 अंतर्गत जिल्हा परिषद सातारा पशुसंवर्धन विभागाकडून ७५ टक्के अनुदानावर १० शेळ्या व एक बोकड वाटप. ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरांचे गट वाटप ( दोन गाई म्हशी) व मिल्किंग मशीनचे वाटप करण्यात येणार आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा परिषद सातारा यांच्या वतीने करण्यात आले आहे. ज्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी शेवट दिनांकाच्या आत विहित नमुन्यामध्ये अर्ज सादर करावा.

पशुसंवर्धन विभागाच्या योजनांविषयी सविस्तर माहिती:
महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत पशुपालन संदर्भातील विविध योजना राबविल्या जातात. अनेक व्यक्तींना शेळीपालन योजना किंवा दुग्ध व्यवसाय करण्याची इच्छा असते परंतु त्यांना या योजनांची माहिती नसल्याची शक्यता असते. त्यामुळे अशा योजनापासून लाभार्थी वंचित राहण्याची सुद्धा शक्यता असू शकते. जिल्हा परिषद योजना अंतर्गत पशूसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनेसाठी लाभार्थी निवड कशी आहे हि आणि इतर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचे स्वरूप आहे:
विशेष घटक योजनेतून अनुसूचित जाती व नवबौद्ध लाभार्थीकडील जनावरांना भाकड कालावधीसाठी शंभर टक्के अनुदानावर खाद्य वाटप, जिल्हा परिषद सेस योजनेतून सर्वसाधारण लाभार्थींना पन्नास टक्के अनुदानावर मिल्किंग मशीन वाटप करणे, कामधेनु आधार योजनेतून पन्नास टक्के अनुदानावर महिला लाभार्थींना एक दुधाळ देशी, संकरित गाय किंवा एक म्हैस वाटप करणे, जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत आदिवासी उपयोजनेतून अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरांचे गट वाटप ( दोन गाई म्हशी ) अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदानावर १० शेळ्या व एक बोकड वाटप, अशा या योजनांचे स्वरूप आहे.

जिल्हा परिषद योजना अंतर्गत पशुसंवर्धन विभागाच्या अर्जाचा नमुना:
या सर्व योजनांसाठी अर्जाचा नमुना पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे तसेच सातारा जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरहि उपलब्ध आहेत. लाभार्थ्यांची निवड हि अर्जासोबत सादर केलेल्या कागद पात्रांची पडताळणी करून निवड समिती सभेत पात्र लाभार्थींची योजनेच्या निकषानुसार निवड करण्यात येईल व उपलब्ध निधीच्या मर्यादेत लाभार्थींना लाभ देण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या योजनेसाठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख:
पशुसंवर्धन विभाग योजनेच लाभ घेऊ इच्छीत लाभार्थ्यांनी १५ जुलै २०२१ पर्यंत नजीकच्या पशुवैदकीय दवाखान्यामार्फत पंचायत समिती कडील पशुसंर्वधन विभागाकडे अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हा परिषद सातारा यांच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे ज्यांना शेळीपालन व्यवसाय करायचा असेल किंवा दुग्धव्यवसाय करायचा असेल अशा लाभार्थ्यांनी या योजनेसाठी विहित नमुन्यामध्ये अर्ज सादर करावा. विहित अर्जाचा नमुना मिळविण्यासाठी तालुक्याच्या पशुसंवर्धन विभागास भेट द्या त्या ठिकाणी हा अर्जाचा नमून उपलब्ध आहे.

विशेष घटक योजना:
* लाभार्थ्यास दोन दुधाळ जनावरांचे गट वाटप करणे

या योजनेचे उद्देश काय आहे:
* जिल्हा दुध उत्पादनास चालना देणे त्याचप्रमाणे अनुसूचित जाती व नवबौध्द लाभार्थींना स्वयंरोजगाराद्वारे उत्पन्नाचे साधन उपलब्ध करुन देणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.

या योजनेचे स्वरूप जाणून घ्या:
* फक्त अनु.जाती व नवबौध्द लाभार्थींसाठी
* दोन गाई / म्हैशींचे वाटप (प्रत्येक लाभार्थीस)
* ७५ टक्के अनुदान विम्यासह रु.६३७९६/-

लाभार्थी निवडीचे निकष:
* दारिद्रय रेषेखालील लाभार्थी
* अत्यल्प भुधारक शेतकरी
* अल्प भूधारक शेतकरी
* सुशिक्षित बेरोजगार
* महिला बचत गटातील लाभार्थी (३०टक्के महिला लाभार्थी ) (३ टक्के अपंगासाठी )
* ब) अनुसूचित जातीतील लाभार्थ्यांना १० अ १ शेळी गट वाटप-

या योजनेचे उद्देशकाय आहे:
* अनु.जाती व नवबौध्द लाभार्थींना ग्रामीण भागात स्वयंरोजगाराद्वारे उत्पन्नाचे साधन उपलब्ध करुन देणेसाठी विषेश घटक योजने अंतर्गत १० अ १ शेळी गट वाटप करण्यात येतो.
* योजनेचे स्वरुप
* फक्त अनु.जाती व नवबौध्द लाभार्थींसाठी
* १० अ १ शेळी गट वाटप (प्रत्येक लाभार्थीस)
* ७५ टक्के अनुदान विम्यासह र.रु. ५३४२९/-

या योजनेसाठी लाभार्थी निवडीचे निकष काय आहेत:
* दारिद्रय रेषेखालील लाभार्थी
* अत्यल्प भुधारक शेतकरी
* अल्प भूधारक शेतकरी
* सुशिक्षित बेरोजगार
* महिला बचत गटातील लाभार्थी (३०टक्के महिला लाभार्थी ), (३ टक्के अपंगासाठी)

दुभत्या जनावरांना खादय वाटप:
* योजनेचे उद्देश
* दुभत्या जनावरांच्या भाकड काळात त्यांना खादय उपलब्ध करुन देणे.
* योजनेचे स्वरुप
* प्राधान्याने वरील योजनेत वाटप केलेल्या जनावरांना १०० टक्के अनुदानावर भाकड काळासाठी गाईस १५० किलो व म्हैशींस २५० किलो खादय मोफत वाटप करण्यात येतो.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Pashusanvardhan vibhag Zillha Parishad scheme news updates.

हॅशटॅग्स

#SarkariYojana(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x