11 May 2025 5:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

मराठा आरक्षण; अन्यथा हिवाळी अधिवेशन होऊ देणार नाही

मुंबई : आज मुंबईमध्ये पार पडलेल्या राज्यव्यापी आंदोलनाच्या नियोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने लवकरच मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका घ्यावी अन्यथा आम्ही हिवाळी अधिवेशन होऊ देणार नसल्याचा इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे.

तसेच ९ ऑगस्ट रोजी करण्यात येणारे आंदोलन हे लोकशाही मार्गानेच करण्यात यावे असे आव्हान या बैठकीत आंदोलकांना करण्यात आले. या मोर्चाच्या नियोजनासाठी ही बैठक विक्रोळीतील पार्क साईट येथे पार पडली. त्यासोबत ७ ऑगस्टला मराठा आरक्षणाच्या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर पुन्हा एक बैठक बोलावण्यात आली आहे.

या सुनावणीनंतर मराठा समाजाची दिशा ठरवली जाणार आहे. दरम्यान जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठा समाज शांत बसणार नाही असा निर्धार यावेळी मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या