28 April 2024 2:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट FD Interest Rate | पैशाने पैसा वाढवा! 1 वर्षाच्या FD वर या 3 बँक देत आहेत 7.75 टक्केपर्यंत व्याज, यादी सेव्ह करा HDFC Credit Card | तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे? मग या 5 चुका टाळा, अन्यथा आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Property Knowledge | फ्लॅट किंवा घर विकत घेण्याचा विचार आहे? या 4 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे-प्रॉपर्टी हातचं जाईल EDLI Calculation | नोकरदार EPFO सदस्यांना मिळतो 7 लाखांपर्यंत मोफत इन्शुरन्स, महत्त्वाचे फायदे लक्षात ठेवा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार? SBI CIBIL Score | पगारदारांनो! 'या' चुकांमुळे तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो, अशा प्रकारे वाढवा क्रेडिट स्कोअर
x

केंद्र सरकारचा शेतकरी विरोधी कायदा महाराष्ट्रात मंजूर होणार नाही | उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विधान

Deputy Chief minister Ajit Pawar

नाशिक, ०१ जुलै | शेतकरी विरोधी कोणतीही भूमिका घेऊन केंद्र सरकारने मंजूर केलेले बिल हे महाराष्ट्रात मंजूर केले जाणार नाही, महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या हिताचाच निर्णय घेईल, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज (गुरुवारी) सय्यद पिंपरी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले त्यावेळी त्यांनी केंद्रीय कृषी कायद्याबाबत आपले मत व्यक्त केले.

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नवीन तीन शेतकरी आणि कामगार विरोधी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकरी गेल्या सात महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. मात्र केंद्रातील सरकारने त्यांच्याकडे ढुंकून देखील पाहिले नाही. मात्र, केंद्राने शेतकऱ्यांच्या विरोधात जो कायदा आणला आहे, तो तसाच महाराष्ट्रात कदापि लागू केला जाणार नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन त्यामध्ये बदल केला जाईल आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी हा कायदा लागू केला जाईल. या संदर्भामध्ये अधिवेशनात चर्चा होईल, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी यावेळी बोलताना दिले.

शेतकऱ्यांना शरद पवारांनी चांगला आधार दिला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न पवार साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सोडवले आहेत. त्यामुळे जगातील पंचवीस देशांमध्ये आज भारतातून अन्नधान्याची निर्यात सुरू झाली आहे, असे सांगून अजित पवार पुढे म्हणाले, जर राजकारणात चांगले काम केले तर लोक लक्षात ठेवतात, नाहीतर ते आपली जागा दाखवून देतात. आजकाल देशांमध्ये काम कमी आणि बोलत राहण्याची प्रथाही वाढत राहिली आहे, ही नवीन पद्धत देशाला घातक ठरू शकते, असेही मत पवार यांनी यावेळी व्यक्त केले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Maharashtra government will not implement the new farm laws says Deputy CM Ajit Pawar news updates.

हॅशटॅग्स

#AjitPawar(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x