4 May 2024 11:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरची घसरण थांबेना! स्टॉक नेमका घसरतोय का? तपशील जाणून घ्या Penny Stocks | कुबेर पैशाचा पाऊस पाडतोय या 10 पेनी शेअर्समधून! 1 दिवसात 40 टक्केपर्यंत परतावा, खरेदी करणार? Infosys Share Price | इन्फोसिस, Wipro, TCS आणि HCL शेअर्सबाबत तज्ज्ञांची भविष्यवाणी, 4 IT शेअर्स मालामाल करणार? Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त झालं, नवे दर तपासा Mahindra XUV700 | महिंद्राची नवी SUV भारतात लाँच, मिळणार जबरदस्त एक्सटीरियर आणि इंटिरिअर 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8'वा वेतन आयोग केव्हा स्थापन होणार? बेसिक पगार किती वाढणार? Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

पवारांवर टीका करण्यासाठीच पडळकरांना आमदारकी | त्यांच्या टीकेचा दर्जा उत्तर देण्यासारखाही नसतो - रोहित पवार

MLA Gopichand Padalkar

नगर, ०१ जुलै | भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. पडळकरांच्या या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. पडळकर यांनी जे वक्तव्य केलंय ते कोणत्याही महिलेला विचाराल तर सांगतील की चुकीची गोष्ट आहे.

सोलापुरात त्या युवकाने जे केलं ते चुकीचं आहे. ही आपली संस्कृती नाही. मात्र, त्यामागील विचारही समजून घेणं महत्वाचं आहे. जे भाजप नेते पडळकरांना प्रोत्साहन देत आहेत, त्यांनी सांगावं की जे वक्तव्य पडळकरांनी केलं ते योग्य आहे का? महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे शोभतं का? असा सवालही रोहित पवार यांनी केलाय. पडळकर यांना जी आमदारकी दिली गेलीय ती फक्त पवारांवर टीका करण्यासाठी देण्यात आलीय. पडळकर अशी टीका करतात की त्याचं उत्तरही देता येत नाही. कारण त्यांच्या टीकेचं उत्तर दिलं तर आपली लेव्हल काय राहिल, असा खोचक टोलाही रोहित पवारांनी लगावलाय. दोन दगडं एकमेकांवर आदळली तर आगच पेटेल, त्यापेक्षा न बोललेलं बरं, असंही रोहित पवार म्हणाले.

दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कारवर दगडफेक झाली होती. त्याच्या निषेधार्थ गुरुवारी (1 जुलै) दुपारी दोन युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस भवनवर दगडफेक केली आहे. दोन्ही युवक दगडफेक करून स्वतः फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे हजर झाले. रामलाल चौक (सोलापूर) येथील राष्ट्रवादीच्या मुख्य कार्यालयावर ही दगडफेक करण्यात आली आहे. शरनू हांडे आणि सोमनाथ घोडके अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

हास्यापद म्हणजे कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरील शोभेच्या झाडाच्या कुंडीखालील दगड कार्यालयाच्या काचांवर भिरकावले खरे, मात्र संबंधित हल्लेखोर युवकांना काचा फुटतील एवढाही जोर लावता नसावा असं चित्र घटनास्थळी पाहायला मिळालं आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: NCP MLA Rohit Pawar criticized BJP leader Gopichand Padalkar after his controversial statement against Sharad Pawar news updates.

हॅशटॅग्स

#GopichandPadalkar(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x