27 April 2024 6:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन

Bollywood

मुंबई, ०७ जुलै |  हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले आहे. बुधवारी सकाळी 7.30 वाजता हिंदूजा रुग्णालयात दिलीपकुमार यांनी वयाच्या 98 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दिलीप कुमार बर्‍याच दिवसांपासून आजारी होते.काही दिवसांपूर्वी त्यांना श्वसनाच्या त्रासामुळे हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरु होते. परंतु बुधवारी पहाटे बॉलिवूडच्या ट्रॅजेडी किंगने शेवटचा श्वास घेतला. दिलीप कुमार यांच्या निधनामुळे बॉलिवूड आणि देशात शोककळा पसरली आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरून दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

बेस्ट अॅक्टरसाठी सर्वाधिक फिल्मफेअर अवॉर्ड:
दिलीपकुमार यांचा जन्म पाकिस्तानमधल्या पेशावरमध्ये झाला होता. त्यांचं मुळ नाव मोहम्मद युसूफ खान असं होतं पण ते जगभर दिलीपकुमार नावानेच ओळखले गेले.

बेस्ट अॅक्टरसाठी सर्वाधिक फिल्मफेअर अवॉर्ड जिंकण्याचं रेकॉर्डही दिलीपकुमार यांच्याच नावावर आहे. दिलीपकुमार हे फक्त अभिनेतेच होते असं नाही तर त्यांनी काही चित्रपटांची निर्मितीही केली. त्यांनी केलेल्या मदतीची, दानशुरपणाचीही दखल जगानं घेतली.

दिलीप कुमार यांचं 1944 साली चित्रपटसृष्टीत पदार्पण:
बॉम्बे टॉकिजनं 1944 साली निर्माण केलेल्या ज्वार भट्टा सिनेमातून दिलीपकुमार यांनी हिंदी सिनेमात पदार्पण केलं. तर 1998 ला आलेली किला हा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Veteran Bollywood Actor Dilip Kumar Passes Away At The Age Of 98 news updates.

हॅशटॅग्स

#Entertainment(27)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x