19 May 2024 6:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

Special Recipe | घराच्या घरी असे बनवा खमंग काकडीचे थालीपीठ

Kakadichi Thalipith recipe in Marathi

मुंबई, ०७ जुलै | महाराष्ट्रीयन स्पेशिअलिटी पदार्थ म्हंटले की आपल्याला जे पदार्थ आठवतात त्यांपैकी एक म्हणजेच थालीपीठ. थालीपीठ हा एक महाराष्ट्रीयन अन्नपदार्थ असून तो पौष्टिक देखील आहे. महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांचा थालीपीठ हा आवडीचा अन्न पदार्थ आहे.आणि हल्ली तर बरेच नॉन महाराष्ट्रीयन लोक देखील थालीपीठ चवीने खातात. ग्रामीण भागात थालीपीठाला धपाटे असे देखील म्हंटले जाते. थालीपीठ दोन प्रकारचे असते,एक म्हणजे भाजणी पासून बनवलेले थालीपीठ आणि दुसरे म्हणजे इन्स्टंट डायरेक्ट घरातील पीठांचे थालीपीठ.

लागणारे घटक:
* 2 काकड्या
* 2 टेबलस्पून आले-लसूण-मिरची-जीरे पेस्ट
* 1 कप कणिक
* 1/2 कप तांदळाचे पीठ
* 1 टेबलस्पून तिखट
* 1 टीस्पून हळद
* चवीनुसार मीठ
* थोडे पाणी
* तेल

संपूर्ण कृती:
* सर्वप्रथम काकडी स्वच्छ धुवून किसून घ्यावी.
* काकडीच्या कीसमध्ये आले-लसूण-मिरची-जीरे पेस्ट आणि कणिक टाकावी.
* त्यानंतर त्यात तांदळाचे पीठ आणि थोडे पाणी घालून सर्व साहित्य मिक्स करून बॅटर बनवून घ्यावे. (बॅटर जास्त पातळ बनवू नये)
* आता बॅटर मध्ये हळद आणि तिखट टाकावे.
* त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालून बॅटर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.
* नॉनस्टिक तव्यावर काकडीचे बॅटर टाकून चमच्याने गोलाकार पसरवून घ्यावे. थालीपीठ च्या किनारला थोडे तेल सोडून थालीपीठ दुसऱ्या बाजूने पलटवून खरपूस भाजून घ्यावा.
* सर्व्हिंग प्लेट मध्ये घेऊन गरमागरम काकडीचे थालीपीठ सर्व्ह करावे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Kakadichi Thalipith recipe in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x