मुंबई ७ जुलै : शिल्लक राहिलेल्या पोळ्या दुसऱ्या दिवशी खायला कंटाळा येतो पण त्याचे तळून स्नॅक्स बनवले तर सगळे खातात म्हणून त्याच्या मस्त वड्या बनवता येतात. त्याचे साहित्य आणि कृती खालीलप्रमाणे आहेत .
साहित्य :
* 3 तयार पोळ्या
* 1/2 कप बेसन पीठ
* 2 टेबलस्पून तांदळाचे पीठ
* 1 टेबलस्पून लाल तिखट
* 1/4 टीस्पून हळद, हिंग
* 1/4 टीस्पून जिरे
* 1/4 टीस्पून ओवा
* 1 टीस्पून हिरवी मिरची लसूण पेस्ट
* चवीनुसार मीठ
* आवडीनुसार कोथिंबीर
* तळण्यासाठी तेल
कृती :
१) बाऊल मध्ये बेसन पीठ घेऊन त्यात वरील सगळे साहित्य घाला व थोडे थोडे पाणी घालून अळू वडी साठी पीठ बनवतो तसे बनवुन घ्या..एक टीस्पून तीळ घाला व मिक्स करा.
२) पोळी, पोळी पाटावर किंवा पराती वर ठेवून पीठाचे मिश्रण लावून घ्या..मग दुसरी, तीसरी पोळी ठेवून याच पद्धतीने पीठ लावून घ्या..रोल बनवून घ्या.
३ ) पुर्ण रोल डब्यात मावत,रहात नसेल तर मधोमध कापून दोन भाग करा व कुकरच्या डब्यात किंवा चाळणीवर ठेवून घ्या.. चाळणीत उकडून घ्यायचे असेल तर टोपात पाणी घालून त्यावर चाळण झाकण ठेवून दहा मिनिटे शिजू द्यावे..कुकरला लावले तर दोन शिट्या काढुन घ्या..मी कुकरमध्ये दोन शिट्या काढुन घेतल्या आहेत.. नंतर पुर्ण थंड करून घ्या.
४) हव्या त्या आकारात कापून तळून घ्या.. मस्त कुरकुरीत पोळीची वडी तय्यार.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News English Title: Left over chapati vadi recipe in Marathi news update.
