6 May 2024 6:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

प्रकाश आंबेडकर यांच्यावर बायपास सर्जरी | हेल्थ बुलेटीन द्वारे माहिती

Prakash Ambedkar

मुंबई, ०९ जुलै | वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर बायपास सर्जरी करण्यात आली आहे. त्यामुळेच ते तीन महिने विश्रांती घेणार असून या दरम्यान कोणत्याही राजकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार नाहीत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं.

वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या रेखा ठाकूर यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर बायपास सर्जरी झाल्याची माहिती दिली. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर 8 जुलै रोजी तातडीने बायपास सर्जरी करण्यात आली आहे. ते सध्या ICU मध्ये आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कारण नाही, असे डॉक्टरानीं कळविले आहे. अजून काही दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात येईल. त्यांच्या प्रकृतीची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या फेसबुक पेजवरून रोज देण्यात येईल, असं रेखा ठाकूर यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, आंबेडकरांना कोणत्या रुग्णालयात आणि कुठे दाखल करण्यात आलं आहे हे स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून 3 महिने दूर राहत असल्याची घोषणा केली होती. मात्र, सुट्टीचे कारण स्पष्ट न केल्याने विविध तर्क लढविले जात असून, त्यांच्या आरोग्याबाबतही चिंता व्यक्त होत होती. दरम्यान, आंबेडकर यांची प्रकृती स्थिर असून, शुक्रवारी हेल्थ बुलेटीन देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानुसार, आज मेडिकल बुलेटीन जाहीर करण्यात आले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Prakash Ambedkar undergoes bypass surgery medical bulletin published news updates.

हॅशटॅग्स

#Prakash Ambedkar(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x