6 May 2024 12:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स मिळणार, 700 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी शेअर्सची लिस्ट, अल्पावधीत मालामाल Tata Power Share Price | टाटा पॉवर स्टॉक चार्टमध्ये 'या' प्राईसवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली Suzlon Share Price | शेअर प्राईस 40 रुपये! 4 वर्षात दिला 1623% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईसबाबत मोठी अपडेट SBI Home Loan | SBI कडून 20 वर्षांसाठी गृहकर्ज घ्यायचं आहे का? महिना EMI आणि व्याज किती लागेल जाणून घ्या IPO GMP | IPO आला रे! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, GMP धुमाकूळ घालतेय, संधी सोडू नका
x

राज्यातील निवडणुका स्थगित करणे हा तर आयोगाचा निर्णय | सरकारचे यश नव्हे - बावनकुळे

Chandrashekhar Bawankule

मुंबई, १० जुलै | कोरोनाची स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. या निर्णयाचे राज्याचे माजी ऊर्जा मंत्री तथा भाजपनेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वागत केले आहे. या निवडणुका स्थगित झाल्याचे यश राज्य सरकारचे नसून निवडणूक आयोगाने कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. यामुळे आता मिळालेली ही संधी आहे. यात राज्याचे ओबीसी नेते छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांनी मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन इंपेरिकल डेटा तयार करावा, तो डेटा उच्च न्यायालयात सादर करावा. त्यानंतर राज्यातील ओबीसीच्या राजकीय आरक्षणावर आलेली गदा दूर केल्यास खऱ्या अर्थाने यश म्हणावे लागेल, अशी टीका नागपुरात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका रद्दचा करण्याचा निकाल आल्यानंतर माध्यमांशी बोलतांना बावनकुळे यांनी हे केली.

आरक्षण मिळवून दिल्यास खऱ्या अर्थाने यश:
राज्य सरकारने या मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन इंपेरिकल डेटा तयार करावा, पुन्हा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी ओबीसीचा सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार डेटा उपलब्ध करून देत आरक्षण मिळवून दिल्यास खऱ्या अर्थाने यश म्हणता येईल. यासोबत विधिमंडळाचा राजकीय उपयोग करून घेतलेला असंविधानिक ठराव रद्द करावा आणि ओबीसींना आरक्षण मिळवुन द्यावे, अशी मागणी बावनकुळे यांनी केली आहे.

कोणीही ओबीसीच्या नावावर उगाच राजकारण करु नयेत:
केंद्रात झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात कोणतेही ओबीसी नेतृत्व नाही. हा आरोप करणे चुकीचे आहे. देशाचे पंतप्रधान स्वतः ओबीसी आहे. सध्याच्या मंत्री मंडळात 27 मंत्री ओबीसी आहे. यामुळे यामध्ये कोणीही राजकारण करायचे काही काम नाही असे बोल बावनकुळे यांनी सुनावले आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP leader Chandrashekhar Bawankule reaction over ZP Panchayat election postponed in state news updates.

हॅशटॅग्स

#OBC(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x