21 May 2024 12:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Infosys Share Price | कमाईची संधी सोडू नका! Infosys आणि TCS सहित हे 7 शेअर्स मजबूत परतावा देणार Hot Stocks | पैशाचा पाऊस पाडणारे 9 स्वस्त पेनी शेअर्स, अवघ्या 5 दिवसात 82 टक्केपर्यंत परतावा मिळतोय Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल मजबूत परतावा Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, संधी सोडू नका Home Loan Down Payment | पगारदारांनो! गृहकर्जासाठी डाऊन पेमेंटची रक्कम सहज मॅनेज होईल, फॉलो करा या टिप्स My EPF Money | नोकरदारांनो! कठीण काळात तुमचे EPF चे पैसे डुबतील, नियम बदलला, कुटुंबालाही कल्पना देऊन ठेवा Demat Account | शेअर्स गुंतवणूकदारांसाठी अलर्ट, ट्रान्झॅक्शन चार्जेससहित डीमॅट खात्याशी संबंधित नियमात बदल
x

Health First | चारोळीचे आरोग्यवर्धक फायदे माहित आहेत का? - वाचा सविस्तर

Health benefits of Charoli in Marathi

मुंबई, १० जुलै | बदलती जीवनशैली, धावपळीचे आयुष्य आणि ताणतणाव यामुळे आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात. वेळी-अवेळी खाण्यापिण्याच्या सवयीमुळे काही जण बद्धकोष्ठता तर काही जुलाब होण्याच्या समस्येमुळे त्रासलेले असतात. जुलाब होण्याच्या समस्येमुळे शरीरात अशक्तपणा निर्माण होतो. यापासून सुटका मिळवण्यासाठी चारोळीचे सेवन करणं हा रामबाण उपाय आहे.

चारोळी हा सुकामेव्यातील एक पदार्थ आहे. गोडाच्या पदार्थांमध्ये,लाडवांमध्ये चारोळी वापरली जाते. मात्र केवळ गोडाच्या पदार्थांपुरता चारोळी मर्यादीत नाही. अनेक आरोग्यदायी फायद्यांसाठीदेखील चारोळीचा नियमित आहारात समावेश करता येऊ शकतो. त्यामध्ये अनेक आरोग्यवर्धक गुणधर्म आहेत.

आरोग्यवर्धक चारोळी:
चारोळीमध्ये कॅलरीज कमी प्रमाणात असतात. चारोळीत प्रोटीन्स आणि फायबर घटक मुबलक प्रमाणात असतात. सोबतच यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 1, व्हिटॅमिन बी 2 आणि नियासिन घटक आढळतात. यासोबतच चारोळीत लोह, कॅल्शियम आणि फॉस्फरस घटक मुबलक प्रमाणात आढळत असल्याने त्याचा आरोग्याला फायदा होतो.

चारोळीचे फायदे:
* शारीरिक कमजोरी दूर करण्यास चारोळी मदत करते. शारीरिक वाढीसाठीदेखील त्याचा फायदा होतो.
* रात्री दूधात चारोळी मिसळून प्यायल्याने सर्दी खोकल्याचा त्रास कमी होतो.
* पुरूषांमध्ये शुक्राणूंची कमतरता भरून काढण्यासाठीही चारोळी फायदेशीर आहे.
* तोंड येण्याचा त्रास वारंवार जाणवत असल्यास त्यापासून सुटका मिळवण्यासाठी 3-4 दाणे चघळा.
* डोकेदुखी, डोकेदुखीतून येणारी चक्कर टाळण्यासाठी चारोळीचे दाणे फायदेशीर होतात. चारोळी तुम्ही थेट खाऊ शकता. याकरिता दूध किंवा पाण्याची गरज नाही.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Health benefits of Charoli in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x