14 May 2024 7:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

Health First | पाणीपुरी खाण्याचे देखील आहेत हे ३ आरोग्यदायी फायदे - नक्की वाचा

Health benefits of eating Panipuri

मुंबई, १० जुलै | जेव्हा कधी तुम्हाला तुमच्या जिभेचे चोचले पुरवावेसे वाटले, अथवा काही चमचमीत खावेसे वाटते तेव्हा पहिले नाव डोळ्यासमोर येते ते पाणी पुरीचे. कोणीही असो पाणीपुरीचे नाव जरी काढले की तोंडाला पाणी सुटते. देशात विविध नावांनी ओळखली जाणारी ही पाणीपुरी तुम्हाला प्रत्येक नाक्यावर अथवा चौकावर पाहायला मिळते. बरेच लोक पाणीपुरी हेल्दी नसल्याने ती खाण्याचे टाळतात. मात्र हा पूर्णतः चुकीचा समज आहे.

तोंड येणं:
अति तिखट किंवा गरम पदार्थ खाल्ल्याने तोंड येण्याचा त्रास जाणवतो. मात्र अशावेळेस पाणीपुरीचा आस्वाद घेतल्यास तोंड येण्याचा येण्याच्या समस्येवर तात्काळ आराम मिळण्यास सुरूवात होते.

पोटाचा त्रास:
चूकीच्या किंवा अति खाल्ल्याने पोट जड वाटणं, पचनाचा त्रास जाणवणं हा त्रास तुम्हांला होत असेल तर पाणीपुरीचा आस्वाद घ्या. पाणीपुरीच्या तिखट पाण्यामध्ये पुदीना, काळं मीठ, जीरं यांचा समावेश केलेला असतो. हे पदार्थ पाचक असल्याने पचनाचा सौम्य स्वरूपातील त्रास दूर होण्यास मदत होते. वाटाण्याऐवजी मूगाचा वापर करणं अधिक आरोग्यदायी आहे. घरच्या घरी बनवलेलं पाणीपुरीचं तिखट पाणी केवळ पिणंदेखील अपचनाचा त्रास दूर करण्यास फायदेशीर आहे.

चिडचिड:
उन्हाळ्याच्या दिवसामध्ये किंवा मूड स्विंग्समुळे होणारी चिडचिड कमी करण्यासाठी पाणीपुरी हा उत्तम पर्याय आहे. मिश्र चवीची पाणीपुरी तुमचा मूड सुधारायला मदत करते.

किती आणि कधी खावी पाणीपुरी ?
संध्याकाळच्या वेळेस पाणीपुरीचा आस्वाद घेणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. एका वेळेस 5-6 पाणीपुरी खाणं आरोग्याच्यादृष्टीने सुरक्षित आहे. जेवणापूर्वी 10-15 मिनिटं पाणीपुरी खाणं आरोग्यदायी आहे. मात्र वर्क आऊट पूर्वी आणि नंतर शक्यतो पाणीपुरी खाणं टाळा.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Health benefits of eating Panipuri in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x