Health First | अपूर्ण झोपेमुळे हाडं कमकुवत होण्याचा धोका
मुंबई, ०८ मार्च: फार कमी झोपेमुळे केवळ आरोग्यच नाही, तर दिनचर्याही बिघडत जाते. परंतु कमी झोपेमुळे हाडंदेखील कमकुवत होत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे हाडं कमकुवत होण्याचा आणि तुटण्याचा धोका वाढण्याची शक्यता असते. (Short sleep may harm your bones health article)
तसेच कमी झोप घेण्याने शरीराला इतर देखील नुकसान होण्याची अधिक शक्यता असते. कमी झोप घेणाऱ्यांना अनेक आजार लवकर बळावत असल्याची शक्यता असते. ज्याचा नकारात्मक परिणाम शरीरात दिसू लागतो. पूर्ण झोप न घेणारे आणि नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्या लोकांनी आपल्या आरोग्याचा विचार करत, दिनचर्येत काही बदल करणं गरजेचं ठरतं. (People who get less sleep are more likely to develop many diseases early)
न्यूयॉर्कमधील बफेलो यूनिव्हर्सिटीतील एका टीमद्वारे यावर संशोधन करण्यात आलं. यावेळी ११,०८४ पोस्टमेनोपॉजल महिलांवर अभ्यास करण्यात आला. महिला आरोग्य उपक्रमांतर्गत, या सर्व महिला सामिल झाल्या होत्या. यावेळी दररोज पाच तास किंवा त्याहून कमी तास झोप घेणाऱ्या महिलांची तुलना, दररोज रात्री सात ते आठ तास झोपणाऱ्या महिलांशी करण्यात आली.
या अभ्यासातून, पाच तास किंवा त्याहून कमी तास झोप घेणाऱ्या महिलांच्या हाडांची घनता कमी होत असल्याचं समोर आलं. या महिलांच्या हाडांचा कमकुवतपणा आणि ऑस्टियोपोरोसिसचा धोका २२ टक्के ते ६३ टक्के इतका होता. यावेळी मान, पाठीचा कणा आणि संपूर्ण शरीरातील हाडं कमकुवत दिसून आली.
पुरेशी झोप न घेतल्यामुळे स्तन कॅन्सर होण्याचा धोका असल्याचंही अनेक संशोधनातून सांगण्यात आलं आहे. झोप पूर्ण न झाल्याने मधुमेह, हृदयविकार, मानसिक समस्यांचा धोका असल्याचंही अनेक अभ्यासातून सांगण्यात आलं आहे.
News English Summary: Short sleep can ruin not only your health but your daily routine. But lack of sleep has also been shown to weaken bones. This increases the risk of bone weakening and fractures.
News English Title: Short sleep may harm your bones health article news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा