5 May 2024 4:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या
x

Special Recipe | घरच्याघरी झणझणीत मटण दम बिर्याणी | नक्की ट्राय करा

Mutton Dum Biryani recipe in Marathi

संपूर्ण साहित्य:
र्धा किलो मटण, अर्धा किलो बासमती तांदूळ, चार कांदे, एक टीस्पून जिरे पावडर, दोन टीस्पून धणे पावडर, दोन टीस्पून लाल तिखट, दालचिनी, काळी मिरी, तमालपत्र, मसाला वेलची, 6-8 लवंग, 10-12 वेलची, चार टेबलस्पून तेल, आलं लसूण पेस्ट, दोन टेबलस्पून दही, कोथिंबीर, पुदिना, हिरव्या मिरच्या, मीठ, पाणी

संपूर्ण कृती:
* जिरेपूड, धणे पूड, लाल तिखट, खडे मसाले, मीठ, हिरवी मिरची आणि आलं-लसूण पेस्ट घालून मटण मॅरिनेट करुन घ्या. त्यामध्ये दही घालून मिश्रण नीट मटणाला लावून घ्या. कमीत कमी तीन ते चार तास मॅरिनेशन फ्रिजमध्ये ठेवा.

* कांदे बारीक चिरुन घ्या. पॅनमध्ये चिरलेले कांदे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तेलात तळून घ्या. कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने चिरुन घ्या. मॅरिनेट केलेल्या मटणात तळलेले कांदे आणि चिरलेली कोथिंबीर-पुदिना घाला.

* बासमती तांदूळ अर्धा तास पाण्यात भिजवत ठेवा. भात करण्यासाठी पाणी उकळत ठेवा. त्यात मीठ, खडे मसाले, चिरलेला पुदिना आणि कोथिंबीर, लिंबाची फोड आणि थोडे तेल घाला.

* उकळत्या पाण्यात तांदूळ घाला आणि भात 80 टक्के शिजवा. जाड बुडाच्या पॅन किंवा प्रेशर कुकरमध्ये मटण घाला. भात गाळून गरम असताना लगेचच मटणावर पसरवून टाका. भातावर आणि सर्व बाजूने तूप घालून घ्या. केशर भिजवून दूध घाला. थोडेसे तळलेले कांदे पसरवा

* कणिक लावून भांड्याचे झाकण घट्ट बंद करा. वाफ जराही बाहेर जाणार नाही याची काळजी घ्या. आधी मोठ्या आचेवर पाच ते दहा मिनिटे, त्यानंतर आच कमी करुन मंद आचेवर 40 ते 45 मिनिटं बिर्याणी दम होण्यासाठी ठेवून द्या. दम बिर्याणी तयार

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Mutton Dum Biryani recipe in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x