नवी दिल्ली : विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला राजस्थान आणि मध्य प्रदेशातून नकारात्मक संकेत मिळत असताना, राहुल गांधी या दोन महत्वाच्या राज्यात सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदे हे दोन तरुण तडफदार नैतृत्व पुढे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपला मोठं आवाहन देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे असं समजतं.
त्यामुळे या दोन्ही राज्यात काँग्रेसची टीम जोमाने कामाला लागली आहे. त्यात मध्य प्रदेशातील लोकप्रिय नेते ज्योतिरादित्य शिंदे हे विधानसभा निवडणूक लढविण्याची शक्यता आहे असं म्हटलं जात आहे. त्यात भोपाळमधील काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यासंबंधित प्रश्न जेव्हा ज्योतिरादित्य शिंदे यांना विचारण्यात आला तेव्हा, ‘पक्ष ठरवेल तिथून मी निवडणूक लढवेन’, अशी प्रतिक्रिया दिल्याने ते मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असू शकतात असे संकेत मिळू लागले आहेत.
ज्योतिरादित्य शिंदे हे उज्जैनमधून विधानसभा निवडणूक लढवू शकतात अशी शक्यता आहे. त्यात राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपचा धुव्वा उडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तरी माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत हे राजस्थान मध्ये जरी मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार असले तरी आयत्यावेळी सचिन पायलट हा तरुण चेहरा पुढे केला जावू शकतो असं स्थानिक राजकीय विश्लेषक बोलत आहेत.
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		