5 May 2024 10:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! HRA पासून ग्रॅच्युइटीपर्यंत फायदा, मोठी वाढ होणार Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार
x

ते कधीच 'वाजपेयी सरकार' म्हणून जगले नाही, तर एनडीए'ची टीम म्हणूनच जगले

नवी दिल्ली : १९९८ मध्ये अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांच्याच काळात राजस्थानमधील पोखरण येथे अणुचाचणी करण्यात आली होती आणि त्यानंतर संपूर्ण जगाला म्हणजे अगदी अमेरिकेच्या सीआयए’ला सुद्धा त्या अणुचाचणीचा सुगावा लागला नव्हता. तो विषय अणुशास्त्रज्ञ ए. पी. जे. अब्दुल कलाम, स्वतः अटलबिहारी वाजपेयी, तत्कालीन संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस आणि भारतीय लष्कर अशा ‘टीम’ने नियोजन पद्धतीने हाताळला होता.

त्यानंतर पाकिस्तानच्या कुरघोडी वाढत असताना ३ मे १९९९ रोजी अखेर पाकिस्तानने कारगिलच्या मुद्याला धरून थेट युद्धच पुकारलं होत. त्यानंतर हे युद्ध जवळपास अडीच महिने पेटलं आणि २६ जुलै १९९९ रोजी भारतीय जवानांनी कारगिलवर तिरंगा झेंडा फडकावून पाकिस्तानची मस्ती जिरवली होती.

त्या कारगिल युद्धात भारताचे ५२७ वीर जवान शहिद झाले होते तर १३०० हून अधिक जवान जखमी झाले होते. त्यावेळची आतंरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा वाजपेयीनीं मुसद्दीपणा दाखवत पाकिस्तानला जेरीस आणलं होत. भारतीय जवानांचे आणि जनतेचे मनोधैर्य उंचावण्यासाठी आणि देशाचे प्रतिनिधी म्हणून संतापलेल्या पंतप्रधान वाजपेयीनीं थेट पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना दूरध्वनी करून खडे बोल सुनावले होते आणि तुम्ही संबंध द्रुढ करण्यासाठी एकाबाजूला आम्हाला लाहोरच निमंत्रण देता आणि दुसऱ्याबाजूला युद्ध पुकारत हे चुकीचं आहे असा सज्जड दम दिला होता.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x