29 April 2024 9:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

भुमिहीन शेतमजुर असल्याचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा? | वाचा सविस्तर माहिती

Certificate of being a landless agricultural laborer

मुंबई, १७ जुलै | विविध शासकीय योजनांसाठी भुमिहीन शेतमजुर असल्याचा दाखला खूप महत्वाचा आहे. आपण या लेखामध्ये भुमिहीन शेतमजुर असल्याचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

भुमिहीन शेतमजुर असल्याचा दाखला ऑनलाईन काढण्याची प्रक्रिया:
भुमिहीन शेतमजुर असल्याचा दाखला ऑनलाईन काढण्यासाठी सर्वात आधी “आपले सरकारची” https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ हि वेबसाईट ओपन करायची आहे.

* त्यानंतर नवीन यूजर या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर वापरुन रजिस्ट्रेशन करावे लागेल, रजिस्ट्रेशन झाल्यावर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर युजर आयडी आणि पासवर्ड येईल तो टाकायचा आहे व तुमच्या जिल्ह्याचे नाव टाकायचे आहे, तसेच खाली तुम्हाला कॅप्चा कोड टाकायचा आहे व लॉगिन करायचे आहे.

* आता तुमच्या पुढे आपले सरकारचे एक पेज ओपन होईल, त्याच्या उजव्या बाजूला इंग्लिश किंवा मराठी भाषा निवडण्यासाठी पर्याय दिलेला आहे, जर तुम्हाला मराठी भाषा निवडायचे असेल तर इंग्लिश वर सिलेक्ट करून त्याखाली मराठी भाषेचा पर्याय निवडा.

* त्यानंतर डाव्या बाजूला तुम्हाला शासनाच्या विविध सेवा आहेत त्या दिसतील, तिथे तुम्हाला “महसूल विभाग” हा पर्याय निवडायचा आहे.

* महसूल विभाग पर्याय निवडल्यानंतर उप विभाग मध्ये महसूल सेवा हा पर्याय निवडायचा आहे.

* हा विभाग निवडल्यानंतर त्याअंतर्गत उपलब्ध असलेल्या सेवांची यादी दिसेल यामध्ये शेतकरी असल्याचा दाखला, विनिश्चिती प्रमाणपत्र देणे, जातीचे प्रमाणपत्र, मिळकतीचे प्रमाणपत्र ,भुमिहीन शेतमजुर असल्याचा दाखला असे बरेच पर्याय दिसतील. त्यातील “भुमिहीन शेतमजुर असल्याचा दाखला” या पर्यायावर क्लिक करायचे आहे, नंतर पुढे जा वर क्लिक करायचे आहे.

* त्यानंतर “महाऑनलाईन” हे एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये “भुमिहीन शेतमजुर असल्याचा दाखला” या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

* यानंतर भुमिहीन शेतमजुर असल्याचा दाखला काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे हे पेज ओपन होईल,

भुमिहीन शेतमजुर असल्याचा दाखला काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे:
ओळखीचा पुरावा (किमान -1):
1) पारपत्र
2) पॅन कार्ड
3) आधार कार्ड
4) मतदार ओळखपत्र
5) मरारोहय जॉब कार्ड
6) निमशासकीय ओळखपत्र
7) आर एस बी वाय कार्ड
8) वाहनचालक अनुज्ञप्ति
9) अर्जदाराचे छायाचित्र

पत्त्याचा पुरावा (किमान -1):
1) पारपत्र
2) वीज देयक
3) भाडेपावती
4) शिधापत्रिका
5) दूरध्वनी देयक
6) पाणीपट्टी पावती
7) मालमत्ता करपावती
8) मतदार यादीचा उतारा
9) वाहनचालक अनुज्ञप्ति
10) मालमत्ता नोंदणी उतारा
11) 7/12 आणि ८ अ चा उतारा

अनिवार्य कागदपत्रे (सर्व अनिवार्य):
1) इतर
2) स्वघोष्णापत्र
3) संबंधित जागेचा ७/१२ आणि ८-अ चा उतारा

* वरील आवश्यक कागदपत्रे पहा आणि नंतर पुढे जा या पर्यायावर क्लिक करा.

* भुमिहीन शेतमजुर असल्याचा दाखला-अर्जदाराचा वैयक्तिक तपशिल:

* त्यानंतर भुमिहीन शेतमजुर असल्याचा दाखला हे पेज ओपन होईल, त्या पेजमध्ये तुम्हाला अर्जामध्ये दाखविल्याप्रमाणे माहिती भरायची आहे.

अर्जदाराचे तपशील:
यामध्ये अर्जदाराचे पूर्ण नाव,वडिलांचे नाव,जन्मतारीख इत्यादी माहिती भरायची आहे.

अर्जदाराच्या निवासाचा तपशिल:
यामध्ये तुमच्या घराचा पत्ता टाकायचा आहे.

सेवेचा विवक्षित तपशील:
यामध्ये अर्जदाराच्या मालकीची जमीन आहे काय?/ अर्जदार अन्य कोणाच्या जमिनीवर शेतमजुरी करतो काय? याची होय किंवा नाही मध्ये निवड करायची आहे.

* अर्जदार अन्य कोणाच्या जमिनीवर शेतमजुरी करतो काय याचे उत्तर होय असे असेल तर ज्या शेतात तुम्ही काम करता आहात किंवा मजुरी करता आहात त्याची संपूर्ण माहिती टाकायची आहे.

* यानंतर “समावेश करा” या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

* समावेश करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्क्रीन वर एक मॅसेज येतो यामध्ये (तुमचा अर्ज यशस्वीरीत्या जतन करण्यात आला आहे) असा मॅसेज असतो . त्यामध्ये तुमचा अर्ज क्रमांक असतो. व पुढे कागदपत्रे अपलोड करा असा ऑपशन येतो तिथे ओके या बटणावरती क्लिक करा.

पु* ढे तुम्हाला फोटो आणि आवश्यक डॉक्युमेंट्स अपलोड करायची आहेत.

* त्यानंतर पैसे भरणे हा ऑपशन येईल. यासाठी तुम्ही कोणत्याही (Online Banking/ Credit Card/ Debit Card/ PayTm / ATM / BHIM App / UPI) पद्धतीने पैसे भरू शकता. पैसे भरल्यानंतरच तुमचा अर्ज तत्सम अधिकाऱ्याकडे जाईल. अर्ज केल्यापासून १५ दिवसात तुम्हाला तुमचा जातीचा दाखला मिळेल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: How to get certificate of being a landless agricultural laborer in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SarkariYojana(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x