14 May 2024 10:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | पगारदारांची पसंती 'या' स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनांना, नोकरदार वर्ग मालामाल होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! जुलैपासून बदलणार DA ची रक्कम, किमान वेतनात वाढ होणार RVNL Share Price | PSU RVNL शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, किती फायदा? Bisil Plast Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! 2 दिवसात 20% परतावा, पैशाचा पाऊस पाडतोय हा स्टॉक Numerology Horoscope | 14 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 14 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर शेअर्स सुसाट तेजीत धावणार, मिळेल 45 टक्के परतावा, फायदा घ्या
x

Special Recipe | झणझणीत खान्देशी मसाला खिचडी बनवा घराच्या घरी - वाचा रेसिपी

Khandeshi Masala Khichdi recipe

मुंबई, 22 जुलै | पावसाळ्यात घरी काहीतरी झणझणीत पदार्थ खाण्याची इच्छा होताच असते. परंतु कमी वेळेत नेमका कोणता पदार्थ झटपट बनवून जिभेचे चोचले पुरवायचे कसे हा देखील तितकाच गंभीर प्रश्न असतो. त्यासाठी आपण आज पाहणार आहोत की झणझणीत खान्देशी मसाला खिचडी घराच्या घरी कशी बनवायची ते;

संपूर्ण साहित्य:
* 1 वाटी तांदूळ
* 1/2 वाटी तूरडाळ
* 1 बटाटा मध्यम आकाराच्या फोडी
* 1 कांदा बारीक चिरून घ्या
* 1 चिरलेला टोमॅटो
* 5 कढीपत्त्याची पाने
* 1 टीस्पून जीरे
* 1 टीस्पून मोहरी
* 1 टीस्पून गरम मसाला
* 1 टीस्पून तिखट
* 1 टीस्पून हळद
* 1 टीस्पून गोडा मसाला
* हिंग
* चवीनुसार मीठ
* 2 टेबलस्पून तेल
* 1/4 वाटी शेंगदाणे
* थोडीशी कोथिंबीर
* 1 टेबलस्पून साजूक तूप

संपूर्ण कृती:
१. प्रथम तांदूळ स्वच्छ धुवून घेणे नंतर एका कुकर मध्ये तेल घेणे तेल तापल्यावर त्यात जीरे, मोहरी, हिंग, व कढीपत्ता ची पानं घालून फोडणी करावी नंतर त्यात कांदा घालून परतून घेणे नंतर त्यात शेंगदाणे व टॉमॅटो घालून मिक्स करून घ्यावे
२. कांदा टोमॅटो चांगला परतून झाल्यावर त्यात हळद, तिखट, गरम मसाला, गोडा मसाला, मीठ व कोथिंबीर घालून मिक्स करून डाळ तांदूळ घालून घेणे व त्यात चार वाट्या पाणी घालून वरून साजुक तूप घालावे झाकण लावून चार शिट्ट्या करून घेणे
३. गरमा गरम खान्देशी मसाला खिचडी तयार वरून तुपाची धार सोडावी खिचडी अप्रतिम लागते

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Khandeshi Masala Khichdi recipe in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x