22 September 2019 2:03 PM
अँप डाउनलोड

सुषमा स्वराज यांना सर्वपक्षीय नेत्यांकडून आदरांजली

Sushma swaraj, Foreign Minister Sushma Swaraj

नवी दिल्ली : भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं मंगळवारी रात्री उशीरा दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झालं. त्या ६७ वर्षांच्या होत्या. रात्री उशीरा कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे त्यांचं निधन झालं. छातीत दुखू लागल्या सुषमा स्वराज यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र रुग्णालयात त्यांनी डॉक्टरांच्या उपचाराला प्रतिसाद दिला नाही. सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर सर्वच स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

आपल्या भाषणांच्या जोरावर सुषमा स्वराज यांनी आपल्या कार्यकाळात संसदेमध्ये सर्वांची मनं जिंकून घेतली. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची बाजू सुषमा स्वराज यांनी अतिशय कणखरपणे मांडली. अनेकदा सुषमा स्वराज यांच्यावर आरोपही झाले, मात्र प्रत्येकवेळी स्वराज यांनी संयम न सोडता प्रत्येक आरोपांना योग्य आणि समर्पक उत्तर दिलं होतं. स्वराज यांच्या निधनानंतर सोशल मीडियावरही नेटीझन्सनी हळहळ व्यक्त केली आहे.

इथे लग्न जमते - मराठी विवाह

हॅशटॅग्स

#Sushma Swaraj(8)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या