3 May 2024 9:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

हायप्रोफाईल राज कुंद्रा प्रकरण | मुंबई पोलिसांचे हात खोलवर जाताच ED सुद्धा प्रकरणात उडी घेणार?

Raj Kundra Porn

मुंबई, २४ जुलै | पॉर्न मूव्हीज प्रकरणात राज कुंद्राला अटक झाल्यानंतर मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा शिल्पा शेट्टीला समन्स बजावणार असल्याचा अंदाज वर्तविला जात होता, पण शिल्पाने राज कुंद्राच्या वियान इंडस्ट्रीजमधून काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिला असल्याची माहिती आता समोर आली आहे. शिल्पा बहुतेक व्यवसायात कुंद्राची भागीदार आहे.

शिल्पाची 6 तास चौकशी केली गेली:
कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी हिचीदेखील पोलिसांकडून चौकशी केली गेली आहे. पोलिसांनी शिल्पाला पोलिस ठाण्यात बोलावले नव्हते, परंतु शुक्रवारी गुन्हे शाखेची एक टीम तिच्या घरी पोहोचली होती. पोलिसांनी यावेळी राज कुंद्रालाही सोबत नेले होते आणि सुमारे 6 तास कुंद्रा आणि शिल्पाला एकत्र बसून चौकशी केली गेली.

शिल्पाला कंपनीकडून किती फायदा झाला याचा गुन्हे शाखा शोध घेत आहे:
शिल्पाही आता मुंबई पोलिसांच्या रडारवर आहे. या प्रकरणात शिल्पाचा किती सहभाग आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न गुन्हे शाखेची टीम करीत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सोबतच शिल्पाला कंपनीच्या पैशांचा काही फायदा झाला का, याची चौकशीही गुन्हे शाखेची टीम करीत आहे.

शिल्पाच्या बँक खात्यांची चौकशी:
शिल्पाच्या बँक खात्यांची चौकशीही गुन्हे शाखेकडून केली जात आहे. या व्यतिरिक्त शिल्पा शेट्टीने ‘वियान इंडस्ट्रीज’च्या डायरेक्टर पदावर किती दिवस काम केले याचा शोध घेण्याचा प्रयत्नही गुन्हे शाखा करत आहे. चौकशीसाठी पोलिस पुन्हा शिल्पाशी संपर्क साधू शकतात.

‘वियान इंडस्ट्रीज’मधील सीसीटीव्ही फुटेजचा तपास करत आहे गुन्हे शाखा:
गुन्हे शाखेचे अधिकारी ‘वियान इंडस्ट्रीज’मधील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. अ‍ॅप्ससाठी डिजिटल कंटेंट होस्ट करणा-या सर्व्हरमधील डेटा डिलीट करणा-या व्यक्तीचादेखील शोध घेतला जात आहे.

राज कुंद्राच्या खात्यात सट्टेबाजीशी संबंधित कंपनीकडून पैसे ट्रान्सफर केले गेले:
फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीम डिलीट केलेला डेटा रिस्टोअर करण्याचा देखील प्रयत्न करीत आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, सट्टेबाजी करणा-या कंपनीकडून कुंद्राच्या खात्यात मोठी रक्कम ट्रान्सफर करण्यात आल्याची माहितीही मिळाली आहे. पॉर्न प्रोजेक्टमधून होणा-या कमाईचा उपयोग सट्टेबाजीसाठी करण्यात आला होता की नाही, याचीही चौकशी गुन्हे शाखा करेल.

ईडीची उडी:
दरम्यान, या प्रकरणात आता ईडीची पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणात एंट्री होई शकते. राज कुंद्रा यांना मुंबई पोलीस गुन्हे शाखेने अटक केल्या संदर्भात पुरावा मिळाल्यानंतर आता ईडी या प्रकरणाची दखल घेणार आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास एजन्सी मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाची एफआयआर मागवेल आणि लवकरच गुन्हा नोंदवेल.

ईडी सूत्रांचे म्हणणे आहे की, राज कुंद्रा यांना FEMA अंतर्गत नोटीस समन्स बजावले जाऊ शकते. भारत आणि ब्रिटन यांच्यात पैशांच्या व्यवहाराचीही चर्चा आहे. ‘येस बँक’ खाते आणि राज कुंद्रा आणि त्यांची कंपनी यांच्या यूबीए खात्यामधील व्यवहाराची चौकशी करण्यात येत आहे. ईडी FEMA च्या नियमांतर्गत चौकशी करेल. तसेच या प्रकरणात, कंपनीच्या संचालकांची देखील चौकशी होऊ शकते. शिल्पा शेट्टीची भूमिका पाहिल्यास तिचीही चौकशी होणार असल्याची शक्यत्ता आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Enforcement Department entry in porn film racket case further increase in the difficulty of Raj Kundra news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x