6 May 2024 12:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी शेअर्सची लिस्ट, अल्पावधीत मालामाल Tata Power Share Price | टाटा पॉवर स्टॉक चार्टमध्ये 'या' प्राईसवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली Suzlon Share Price | शेअर प्राईस 40 रुपये! 4 वर्षात दिला 1623% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईसबाबत मोठी अपडेट SBI Home Loan | SBI कडून 20 वर्षांसाठी गृहकर्ज घ्यायचं आहे का? महिना EMI आणि व्याज किती लागेल जाणून घ्या IPO GMP | IPO आला रे! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, GMP धुमाकूळ घालतेय, संधी सोडू नका Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल
x

आसाम-मिझोराम सीमेवरील रक्तपात | हेच महाराष्ट, प. बंगालच्या सीमेवर घडलं असतं तर शहांनी...

Congress leader Srivatsa

गुवाहाटी, २७ जुलै | आसामच्या बराक खोऱ्यातील कछर, करीमगंज आणि हैलकांडी यांची मिझोरामच्या ऐझॉल, कोलासिब आणि मामित या तीन जिल्ह्य़ांना लागून १६४ किलोमीटरची सीमा आहे. त्याबाबत दोन्ही राज्यांमध्ये वाद आहे. याच वादातून सोमवारी पुन्हा एकदा सीमेवर संघर्षाचा उद्रेक झाला. दोन्ही राज्यातील वादग्रस्त सीमा ओलांडून आसाम पोलिसांनी मिझोराममधील कोलासिब येथील एका पोलीस चौकीचा ताबा घेतल्यानंतर तेथे हिंसाचाराला तोंड फुटले.

यावरून सोमवारी उसळलेल्या रक्तरंजित संघर्षात पाच पोलीस अधिकारी सहा पोलिसांचा मृत्यू झाला आहे. यात मूळचे महाराष्ट्रातील आणि सध्या कछरच्या पोलीस अधिक्षकपदी कार्यरत असलेले वैभव निंबाळकर जखमी झाले आहेत.

याच विषयाला अनुसरून राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे, “या घटनेत मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबाप्रती मी आपली संवेदना व्यक्त करतो. याच बरोबर जखमी लोक लवकरात लवकर बरे होतील यासाठी प्रार्थना करतो. या घटनेमुळे पुन्हा एकदा गृह मंत्र्याचे अपयश समोर आले आहे. ते देशातील नागरिकांत द्वेष आणि अविश्वास निर्माण करण्याचे काम करत आहेत. यामुळे भारत आता खराब परिस्थितीचा सामना करत आहे.” राहुल यांनी आपल्या या ट्विटसोबत घटनेचा व्हिडिओही जोडला आहे.

दुसरीकडे काँग्रेस नेते श्रीवत्सा यांनी देखील अमित शहांना लक्ष केलं आहे. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी महाराष्ट्र आणि प. बंगालच्या सीमेचं उदाहरण दिलं आहे. यासंदर्भात ट्विट करताना त्यांनी म्हटलंय कि, “आसाम मिझोराम सीमेवर जे घडलं ते जर प. बंगाल आणि महाराष्ट्राच्या सीमेवर घडलं असतं तर काय झालं असतं? अमित शहांनी राष्ट्रपती राजवटीची मागणी केली असती, राज्यपाल सीमेवर पोहोचले असते, प्रकरण सर्वोच्य न्यायालयात जाऊन सुमो मोटो दाखल झाला असता, प्रसार माध्यमांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे राजीनामे मागितले असते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Congress leader Srivatsa slams Amit Shah over Assam Mizoram border conflicts news updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x