3 May 2024 7:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

आज निवडणूक झाल्यास एनडीएला तब्बल १०८ जागांचं नुकसान होईल : सर्वे

नवी दिल्ली :  आजच्या घडीला लोकसभा निवडणूक झाली आणि काँग्रेसने सपा, बसपा आणि तृणमूल काँग्रेससोबत हातमिळवणी केली तर भाजपाप्रणित एनडीएला बहुमत मिळणार नाही. इंडिया टुडे आणि कार्वी इनसाइट्सने ‘मूड ऑफ द नेशन’ नावाने एक सर्व्हे केला आहे. साडे चार वर्षांनंतर युपीए आघाडीला दुपटीने जागा मिळताना दिसत आहेत. तर एनडीएला ५५ जागांचं नुकसान होताना दिसत आहे.

दुसऱ्या राजकीय परिस्थितीनुसार, जर काँग्रेसप्रणीत युपीएने सपा, बसपा आणि तृणमूल काँग्रेसला सोबत घेतलं तर एनडीएची मतदान टक्केवारी कमी होणार नाही मात्र जागा कमी होऊन २२८ होऊ शकतात. याचा अर्थ एनडीएला एकूण १०८ जागांचं नुकसान होऊ शकतं. तर युपीएच्या जागा वाढून २२४ होऊ शकतात. सोबतच मतदान टक्केवारी वाढून ४१ टक्के होऊ शकते, म्हणजे युपीएला १६४ जागांचा फायदा होऊ शकतो. इतरांच्या खात्यात ९२ जागा आणि २३ टक्के मतं जाऊ शकतात. महत्वाचं म्हणजे एनडीए आणि युपीएमध्ये फक्त चार जागांचं अंतर राहत आहे. त्यामुळे लोकसभेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण होऊ शकते.

तिसरी राजकीय परिस्थिती दक्षिणेतील प्रादेशिक पक्षांच्या युतीवर आधारित आहे. सर्व्हेत सांगितल्यानुसार, जर एनडीएने तामिळनाडूमधील सत्ताधारी पक्ष अण्णाद्रमूक आणि आंध्र प्रदेशातील विरोधी पक्ष वायएसआर काँग्रेसला सोबत घेतलं आणि काँग्रेसने टीडीपी आणि जम्मू काश्मीरमधील पीडीपीला सोबत घेतलं तर एनडीएचा जागांचा आकडा २५५ पर्यंत पोहोचू शकतो. तसंच मतदान टक्केवारी ४१ टक्के होऊ शकते. अशा परिस्थितीत युपीएला २४२ जागा आणि ४३ टक्के मतं मिळू शकतात. इतरांना ४६ जागा आणि १६ टक्के मतं मिळू शकतात. अशा परिस्थितीतही लोकसभेत त्रिशंकू होईल.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x