6 May 2024 2:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

महाराष्ट्रासह १० राज्यात कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय | केंद्राकडून कडक उपाययोजना करण्याच्या सूचना

Corona Pandemic

मुंबई, ०१ ऑगस्ट | राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण वाढताना दिसत आहे. आजही राज्यात कोरोना रुग्णांची वाढ झाल्याचं समोर आलं आहे. सार्वजनिक आरोग्य विभागानं जारी केलेल्या माहितीनुसार राज्यात 6959 रुग्णांची वाढ झाली आहे. तर, राज्यात आज 225 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

देशात पुन्हा एकदा करोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढली आहे. मागच्या चार दिवसात करोनावर उपचार करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दहा राज्यात करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याचं दिसून आलं आहे. यासाठी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दहा राज्यांचा आढावा घेतला.

रुग्णवाढ कायम:
केरळच्या स्थितीवरून महाराष्ट्रात काही जिल्हे अलर्ट झाले असल्याचं समोर आलंय. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार राज्यात आज 6959 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. तर, 225 जणांचा मृत्यू झाल्यानं राज्यातील सध्याचा मृत्यूदर 2.1 टक्के झाला आहे.

केरळमध्ये कोरोनाचा स्फोट:
केरळ सरकारच्या माहितीनुसार गेल्या चोवीस तासात तिथं कोरोनाच्या 20 हजार 772 नवे रुग्ण आढळून आलेत. तर 116 रुग्णांचा मृत्यू झालाय. देशात ज्या नव्या केसेस सापडतायत त्यात एकट्या केरळचा वाटा हा पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आहे. केरळमध्ये 13.61 एवढा संक्रमनाचा दर आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पहाता, तिथल्या सरकारनं शनिवार, रविवार असे दोन दिवस संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केलीय.

केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार देशात २४ तासांत ४१ हजार ६४९ नवे करोनाबाधित आढळून आले आहेत. शुक्रवारी हाच आकडा ४४ हजार २३० इतका होता. त्यासोबतच देशात गेल्या २४ तासांत ३७ हजार २९१ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. हे रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे करोनावर मात केलेल्या रुग्णांची आजपर्यंतची आकडेवारी आता ३ कोटी ७ लाख ८१ हजार २६३ इतकी झाली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Union Government alert on strict action corona outbreak in 10 states news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x