27 April 2024 4:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट Shukra Rashi Parivartan | 'या' आहेत त्या 3 नशीबवान राशी, 100 वर्षांनंतर आलेलं राशी परिवर्तन अत्यंत शुभं ठरणार Mutual Fund SIP Top-Up | SIP टॉप-अप करून चौपट कमाई करा, SIP रु. 2000 आणि मिळतील 17 लाख 36 हजार रुपये Yes Bank Share Price | एका वर्षात 67 टक्के परतावा देणाऱ्या येस बँक शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, दिले फायद्याचे संकेत IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, स्टॉकला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट Vedanta Share Price | कमाईची सुवर्ण संधी! वेदांता शेअर्स अल्पावधीत देईल 40 टक्के परतावा, वेळीच फायदा घ्या
x

शेतकऱ्यांनो ‘या’ तारखेला तुमच्या खात्यात जमा होणार 9 व्या हप्त्याचे 2,000 रुपये | अशी ऑनलाइन नोंदणी करा

How to apply for PM Kisan Samman Nidhi online

मुंबई, ०३ ऑगस्ट | पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात १० ऑगस्टपासून पीएम किसान योजनेच्या नवव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पूर्वीप्रमाणेच, ज्यांचा वडिलोपार्जित जमिनीत वाटा आहे त्यांना यापुढे या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. जर तुमच्या नावावर सुद्धा शेतजमीन असेल तर हे काम त्वरित करा अन्यथा तुमचा पुढचा हप्ता अडकू शकेल.

पीएम किसान योजनेअंतर्गत, मोदी सरकार दरवर्षी 2000, 2000 च्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना 6000 रुपये देते. याअंतर्गत प्रत्येक वर्षाचा पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान दिला जातो.

दरम्यान, ९ व्या हप्त्यासाठी २ हजार रूपयांची लवकरच प्रतीक्षा संपणार आहे. १० ऑगस्टपर्यंत ११.५ कोटीहून अधिक शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे हस्तांतरित करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे. या योजनेमध्ये पात्र शेतकऱ्यांनाच याचा लाभ आतापर्यंत मिळाला आहे.

ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया:
या योजनेत नोंदणी करणे अगदी सोपे आहे. तुम्ही घरबसल्या ही प्रक्रिया ऑनलाईन पूर्ण करू शकता. या व्यतिरिक्त, तुम्ही या योजनेसाठी पंचायत सचिव किंवा तलाठी किंवा स्थानिक कॉमन सर्विस सेंटरद्वारे अर्ज करू शकता. या व्यतिरिक्त, आपण या योजनेसाठी स्वतःची नोंदणी देखील करू शकता.

तुम्ही अशा प्रकारे नोंदणी करू शकता:
* तुम्हाला आधी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. https://pmkisan.gov.in/
* आता Farmers Corner वर जा.
* येथे तुम्हाला ‘New Farmer Registration’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
* यानंतर तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल.
* यासह, कॅप्चा कोड टाकून राज्याची निवड करावी लागेल आणि नंतर प्रक्रिया पुढे चालवावी लागेल.
* या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती भरावी लागेल.
* यासोबतच बँक खात्याचा तपशील आणि शेतजमिनीशी संबंधित माहिती भरावी लागेल.
* त्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: How to apply for PM Kisan Samman Nidhi online in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SarkariYojana(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x