20 May 2024 9:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

Ganesha Ecosphere Share Price | गणेश इकोस्फियर कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली, 310% परतावा देणारा शेअर पुन्हा मल्टिबॅगर परतावा देणार?

Ganesha Ecosphere Share Price

Ganesha Ecosphere Share Price | गणेश इकोस्फियर लिमिटेड कंपनीचे शेअर्स मागील काही महिन्यांपासून विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. मात्र आता या कंपनीचे शेअर्स पुन्हा चर्चेत आले आहेत. नुकताच कंपनीने सेबीला कळवले आहे की, त्यांना कोका कोला इंडिया कंपनीने R-PET रेझिन पॅकेजिंग मटेरियलचे प्रीफॉर्म कन्व्हर्टर पुरवण्याचे कंत्राट दिले आहे.

मागील महिन्यात गणेश इकोस्फियर कंपनीने मून बेव्हरेजेस लिमिटेड कंपनीसोबत मोठा करार केल्याची माहिती दिली होती. मून बेव्हरेजेस लिमिटेड ही कोका कोला कंपनीची ऑथराइज्ड बॉटलर म्हणून ओळखली जाते. ही कंपनी फूड ग्रेड पॅकेजिंगमध्ये आर पेट चिप्सचा वापर करण्याचा प्रयत्न करत आहे आणि परकीय गुंतवणूकदारांनी देखील या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. शुक्रवार दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी गणेश इकोस्फियर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.25 टक्के घसरणीसह 1,066.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

4 ऑगस्ट 2023 रोजी गणेश इकोस्फियर कंपनीला कोका कोल कंपनीने ऑर्डर दिली होती. मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. 11 सप्टेंबर 2020 रोजी गणेश इकोस्फियर कंपनीचे शेअर्स 256 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आता हा स्टॉक 1070 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

अवघ्या 3 वर्षात, गणेश इकोस्फियर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 310 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 10 वर्षांत गणेश इकोस्फियर या प्लास्टिक रिसायकलिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना 2600 टक्के परतावा कमावून दिला आहे. गणेश इकोस्फियर ही एक कंपनी मुख्यतः प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर करून पॉलिस्टर स्टेपल, फायबर स्पन यार्न आणि डाएट टेक्सचर यार्न बनवण्याचे काम करते.

गणेशा इकोस्फियर कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मागील दहा वर्षात या कंपनीने 41 अब्जपेक्षा जास्त R-PET बाटल्यांचे पुनर्वापर केले आहे. यासोबतच कचरा पुनर्वापराच्या प्रक्रियेमुळे कंपनीने 54 लाख घनक्युबिक लँडफिल स्पेसची बचत केली आहे.

प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करून, गणेश इकोस्फियर कंपनीने 11 लाख टन CO2 उत्सर्जन होण्यापासून रोखले आहे. गणेशा इकोस्फियर लिमिटेड कंपनीने मागील दहा वर्षात 350 टनांपेक्षा जास्त पेट प्लास्टिकचा पुनर्वापर करून पर्यावरणाला स्वच्छ करण्यास हातभार लावला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Ganesha Ecosphere Share Price today on 09 September 2023.

हॅशटॅग्स

Ganesha Ecosphere Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x