11 May 2024 8:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 12 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांनी टाटा पॉवर शेअर्सची रेटिंग घटवली, स्टॉक प्राईसवर मोठा परिणाम होणार Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स खरेदी करा, किंमत 1 रुपया ते 7 रुपये, मोठी कमाई होईल GMP IPO | पहिल्याच दिवशी मालामाल करणारा IPO लाँच होतोय, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, खरेदी करणार? Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअर्सला किती फायदा होणार?
x

Tokyo Olympic 2020 | लवलिना बॉक्सिंगच्या उपांत्य फेरीत पराभूत | पण देशासाठी कांस्यपदक जिंकलं

Tokyo Olympics 2020

टोकियो, ०४ ऑगस्ट | टोकियो ऑलिम्पिक बॉक्सिंगच्या 69 किलो वजनी गटात भारतीय बॉक्सर लवलिना उपांत्य फेरीच्या लढतीत गतविजेता तुर्कीच्या बुसेनाझ सुरमेलीकडून पराभूत झाली आहे. लवलिना पराभूत झाली, पण तिने आपल्या खेळाने भारतीय बॉक्सिंगमध्ये नवा इतिहास लिहिला आहे. ती कांस्यपदकासह भारतात परत येईल.

लवलिना हा सामना जिंकली असती तर ती ऑलिम्पिक बॉक्सिंगच्या अंतिम फेरीत पोहोचणारी भारताची पहिली बॉक्सर बनली असती. ऑलिम्पिक भारतीय बॉक्सर्सच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीची तिने बरोबरी केली आहे. विजेंदर सिंग (2008 मध्ये) आणि एमसी मेरी कॉम (2012 मध्ये) उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास केला आहे.

लवलिना आणि बुसेनाझ दरम्यान आतापर्यंत कोणतीही लढत झाली नव्हती. त्यांच्यातील पहिली लढत बुधवारी झाली. बुसेनाझने उपांत्यपूर्व फेरीत युक्रेनच्या ॲना लिसेन्कोचा 5-0 असा पराभव केला होता. लोवलिनाने उपांत्यपूर्व फेरीत चायनीज तैपेईच्या चिन चेनचा पराभव केला होता. चेन माजी विश्वविजेता देखील आहे. विशेष गोष्ट अशी की, ऑलिम्पिकपूर्वी लवलिना चेनविरुद्ध चार सामन्यात पराभूत झाली होती.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Tokyo Olympics 2020 Live Lovlina earns bronze medal for India news updates.

हॅशटॅग्स

Tokyo Olympics 2020(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x