18 May 2024 12:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL स्टॉकमध्ये तुफान तेजी, शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने धावतोय, फायदा घेणार? Wipro Share Price | विप्रो स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआऊटचे संकेत, मोठी कमाई होणार, टार्गेट प्राइस जाणून घ्या Ashok Leyland Share Price | मालामाल करणाऱ्या स्टॉकच्या खरेदीला ऑनलाईन गर्दी, तज्ज्ञांचा शेअर्स खरेदीचा सल्ला Infosys Share Price | इन्फोसिस शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक स्वस्तात विकत घ्यावा? Hold करावा की Sell करावा? Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR करताना 'या' 10 चुका टाळा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा Post Office Interest Rate | तुमच्या कुटुंबासाठी 'या' 3 पोस्ट ऑफिस योजना वरदान ठरतील, फायदे जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांसाठी खास SIP योजना नोट करा, महिना बचत देईल 1 कोटी 4 लाख रुपये परतावा
x

Special Recipe | कोल्हापुरी गावरान चिकन मसाला घरच्याघरी बनवा - पहा रेसिपी

Kolhapuri Chicken Masala recipe in Marathi

मुंबई ४ ऑगस्ट : पावसाळ्यात काहीतरी झणझणीत खाण्याची आपली अनेकदा इच्छा होतं असते. त्यातही आपण घरच्याघरी बनविण्यासाठी एखादा कोल्हापुरी पद्धतीचा पदार्थ निवडल्यास बातच वेगळी म्हणावी लागेल. चला तर आज आम्ही तुम्हाला कोल्हापुरी गावरान चिकन मसाला घरी कसा बनवायचा हे सांगणार आहोत;

साहित्य :
* 1 किलो चिकन स्वच्छ केलेले धुऊन
* 1.5 वाटी सुके खोबरे
* 3 मोठे कांदे
* 10-12 लसूण पाकळ्या
* आलं
* कोथिंबीर
* 1 टेबलस्पून लाल तिखट
* 1 टेबलस्पून कांदा लसूण मसाला
* 1 टीस्पून हळद
* 1/4 कप धणे
* 1/4 कप जीरे
* 6 लवंगा
* 10 काळिमिरी
* मीठ चवीनुसार
* तेल

कृती :

१. चिकनला हळद,मीठ लावून कढईत चिकन आणि पाणी घालून शिजायला ठेऊन द्या..

२. गॅसवर कांदे,खोबरे काळसर रंग येईपर्यंत भाजून घ्या.

३. पॅनमधे धणे,काळिमिरी,लवंगा,जीरे छान खमंग भाजून घ्या. मिक्सरला इ मांड्या भाजलेले कांदे,खोबरे चिरून घाला व त्यात लसूण,आलं कोथिंबीर,भाजलेला . मसाला आणि थोडं पाणी घालून बारीक वाटणे वाटून घ्या.

४. कढईत थोडं जास्त तेल गरम करून त्यात लाल तिखट,कांदा लसूण मसाला, टोमॅटो एकत्र छान परतून घ्या. टोमॅटो मुळे मसाला जळणार नाही. नंतर त्यात वाटलेला मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे.

५. नंतर त्यात शिजवलेले चिकन,मीठ थोडं बेतानेच घालावे आणि चिकन मधील पाणी घालून छान एकत्र करून शिजू द्या. चिकन आधी शिजल्यामुळे फार वेळ लागणार नाही.

६. आपलं अस्सल कोल्हापुरी गावरान चिकन मसाला तयार!! वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Recipe Title: Kolhapuri Chicken Masala recipe in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x