मुंबई, ०६ ऑगस्ट | पोहे हा आपल्या सर्वांच्या नाश्ताच्या आवडीचा पदार्थ पण याच पोह्यापासून काहीतरी नाविन्यपूर्ण सुद्धा बनवता येतं आणि तेही झटपट. असाच एक पोह्याचा प्रकार म्हणजे दडपे पोहे.

साहित्य:
* पाव किलो पातळ पोहे
* ४/५ हिरव्या मिरच्या
* अर्धी वाटी खवलेला नारळ
* थोडी कोथिंबीर
* थोडं आलं
* अर्धा लिंबू
* चवीनुसार मीठ -साखर
* तेल
* फोंडणीचे साहित्य

कृती:
१. एक परातीत पोहे घ्यावे.
२. त्यावर मीठ-साखर, खोबर ,कोथिंबीर घालावे . लिंबाचा रस सुद्धा घालावा.
३. एक पाली तेलाची हिंग, मोहरी,हळद घालून फोडणी करावी . त्यात मिरचीचे तुकडे घालावे.
४. एक मिन नंतर आलं किसून टाकावे.
५. शेवटी ही फोडणी पोह्यावर घालून पोहे नीट कालवून घ्यावे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Recipe Title: Dadpe Pohe recipe in Marathi news updates.

Special Recipe | सकाळी नाश्त्याला बनवा ‘दडपे पोहे’ – पहा रेसिपी