18 May 2024 9:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

GDP'चा विकास दर 7 टक्क्यापर्यंत खाली येऊ शकतो | केंद्राकडून लस पुरवठ्यात भेदभाव - अभिजीत बॅनर्जी

GDP

कोलकाता, ०६ ऑगस्ट | कोरोनाची संभाव्य तिसरी लाट जीडीपीवर विपरित परिणाम करू शकते. देशाचा जीडीपीचा विकास दर 7 टक्क्यापर्यंत खाली येऊ शकतो, असे नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. तसेच केंद्र सरकार संपूर्ण देशाला पुरेसा ठरेल इतकं लसींचं उत्पादन आणि पुरवठा करण्यास असमर्थ आहे, असेही त्यांनी म्हटलं. तसेच केंद्र सरकार राज्यांना लसीचा पुरवठा करताना भेदभाव करत असल्याचे त्यांनी म्हटलं. गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक या राज्यांना पुरेशा प्रमाणात लसींचा पुरवठा होत आहे. तर बिगर भाजपा राज्यांना लसीचा पुरवठा केला जात नाही, असे ते म्हणाले. केंद्राने राज्यांमध्ये भेदभाव न करता लसीचा पुरवठा करावा, असे ते म्हणाले.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अभिजीत बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली ग्लोबल अॅडवायजरी बोर्डाची नियुक्ती केली आहे. राज्याला करोनासंदर्भात सल्ला देण्यासाठी या समितीचं गठन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या समितीची स्थापना केली आहे. कोलकातामध्ये या समितीची बैठक पार पडली. यावेळी अभिजीत बॅनर्जी यांनी लस पुरवठा, देशाची लसीकरण मोहीम आणि केंद्र सरकारचं अपयश या मुद्द्यांवरून परखड भूमिका मांडली आहे.

देशाचा आर्थिक विकास जर होत नसेल. तर राज्याचा विकास कसा होईल. राज्यातील अनेक कामगार इतर राज्यात काम करतात. स्थलांतरीक कामगारांकडून मोठ्या प्रमाणात उत्पन्न येते. देशाच्या अर्थव्यवस्थेने वेग घेतल्यास, राज्याचा अर्थव्यवस्था रुळावर येते. राज्य सरकारे सध्या फक्त मदत करू शकतात. मात्र, जेव्हा देशाची अर्थव्यवस्था सुधारेल, तेव्हाच या समस्या दूर होतील, असे बॅनर्जी म्हणाले.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) गेल्या महिन्याच्या अखेरीस जारी केलेल्या अहवालात भारताच्या अंदाजित विकास दरात कपात केली होती. जगभरातील अर्थव्यवस्थांचा मागोवा घेणाऱ्या या आंतरराष्ट्रीय संस्थेने म्हटले, की 2021-22 या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर 9.5 टक्के राहील. यापूर्वी 12.5 टक्के असा अंदाज लावण्यात आला होता. म्हणजेच भारताचा विकास दर तीन टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. या वेगाने घसरण्याचे कारण कोरोना आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: The Covid third wave may pull GDP growth down to 7 percent said economist Abhijit Banerjee news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x