14 May 2024 4:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार IPO GMP | पैसे तयार ठेवा, या 5 कंपन्यांचे IPO गुंतवणुकीसाठी खुले होणार, पहिल्याच दिवशी मालामाल करणार
x

Parenting | 'या' चांगल्या सवयी तुमच्या पुढच्या पिढीला नक्की शिकवा - नक्की वाचा

Parenting

मुंबई ०८ ऑगस्ट | आपल्या पालकांनी आणि आजी-आजोबांनी आपल्याला लहानपणी या चांगल्या गोष्टी करण्याची सवय लावली.सकाळी लवकर उठणे, देवाला नमस्कार करणे, सायंकाळी दिवा लावुन शुभंकरोती व श्लोक म्हणणे, जमिनीवर मांडी घालुन व हातपाय धुऊनच जेवायला बसणे.यापैकी किती गोष्टी तुम्ही आजही करता? वडीलधा-यांनी शिकवलेल्या कोणत्या चांगल्या सवयी तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीलादेखील शिकवल्या आहेत?

तुमच्या मुलांचे व्यक्तिमत्व घडवतील अशा काही चांगल्या सवयी:

सकाळी लवकर उठणे:
तुम्ही रोज सकाळी लवकर उठता का? लेटनाईट पार्टीज, रात्री उशीरापर्यंत काम करणे किंवा रात्री बाहेर उशीरा फिरण्याच्या सवयीमुळे रात्री लवकर झोपुन सकाळी लवकर उठणे सर्वांनाच शक्य होते असे नाही. मात्र आयुर्वेदानुसार निरोगी आयुष्यासाठी आपण रोज सकाळी लवकर उठले पाहीजे.सकाळी लवकर उठल्याने शरीरावरचा ताण कमी होतो व पुर्ण दिवस आनंदात जातो.या सवयीमुळे तुम्हाला व्यायाम करण्यास वेळ मिळतो.रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठल्याने तुम्हाला फ्रेश वाटते व त्याचा तुमच्या कामावर चांगला परिणाम होतो. Psychiatry and Clinical Neurosciences मध्ये छापुन आलेल्या संशोधनानुसार सकाळी लवकर उठणा-या लोकांना डिप्रेशनचा धोका कमी असतो.

जमिनीवर बसून जेवणे:
सहसा लोक डायनिंग टेबल किंवा सोफ्यावर बसुन जेवतात.पण असे जेवणे आपल्या आरोग्यासाठी हितकारक नाही.आपल्या पुर्वंजाप्रमाणे आपणही जमिनीवर मांडी घालुन बसुनच जेवले पाहीजे.कारण जमिनीवर बसुन जेवल्याने आपली पचनशक्ती सुधारते,वजन कमी होण्यास मदत होते,बॉडी पॉश्चर सुधारते,गुडघे आणि सांध्याचे कार्य सुरळीत चालते व रक्ताभिसरण देखील व्यवस्थित होते.

जेवताना पाणी पिऊ नये:
आपण नेहमी जेवताना एक चुक करतो ती म्हणजे ताटासोबत एक पाण्याचा भरलेला ग्लास घेतो.जरी वडीलधा-यांनी जेवताना पाणी पिऊ नये हे सांगितले असले तरी आपण जेवताना पाणी पितो.जेवताना पाणी पिऊ नये यामागचे शास्त्रीय कारण असे की, त्यामुळे पचनासाठी पोटात निर्माण होणारे गॅस्ट्रीक ज्युस किंवा पाचकरस डायल्युट होतात.सहाजिकच त्यामुळे पचनप्रकिया मंदावते व अपचनाचा त्रास होतो.डायटिशन नेहा चंदा यांच्या मते, ‘जेवताना पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी देखील वाढते.

रात्री सूर्यास्तापुर्वी जेवा:
तुमचे आईवडील तुम्हाला रात्री आठ वाजण्यापुर्वी जेवा व लवकर झोपा असे सांगायचे का? जर तुमचे उत्तर होय असेल तर तुम्ही देखील तुमच्या मुलांना ही चांगली सवय जरुर लावा.आयुर्वेदानुसार आपण दररोज ‘रात्रीचर्ये’च्या पहिल्या प्रहरात जेवले पाहीजे.ज्यामुळे आपल्या शरीराचे कार्य निसर्गचक्राशी सुसंगत रहाते.तसेच त्यामुळे तुमचे वजन कमी होते,पचनाच्या समस्या दूर होतात,झोप चांगली लागते व तुम्ही दुस-या दिवशी उठल्यावर फ्रेश राहता.

गरम पाण्याने केस न धुणे:
आपले पुर्वज केस धुताना थंड पाण्याचा वापर करायचे.कारण गरम पाण्याने केस धुतल्यामुळे केसांच्या त्वचेतील पी.एच चे प्रमाण वाढते व परिणामी केस गळु लागतात. हेअर एक्सपर्ट जावेद हबीब यांच्या मते, ‘गरम पाण्याने केस धुतल्यास ते कोरडे व कमजोर होतात त्यामुळे ते पातळ दिसु लागतात.’ त्यामुळे शरीराचे व केसांचे तापमान नियमित ठेवण्यासाठी थंड पाण्याने केस धुवा.

जेवणापुर्वी व जेवणानंतर हात स्वच्छ धुणे:
मुलांना चांगली सवय लावण्यासाठी जरी ते काटे-चमच्याने जेवत असतील तरी जेवण्यापुर्वी त्यांना हात स्वच्छ धुण्यास सांगा.यामुळे त्यांना डायरिया,फुड इनफेक्शन व हिपॅटायटीस होण्याचा धोका कमी होतो.स्वच्छता व अधिक सुरक्षेसाठी जेवणानंतरही हात धुण्याची सवय त्यांना लावा.

जेवणानंतर चूळ भरा:
जेवणानंतर तुम्ही चूळ भरता का ? नसेल तर तुम्ही ही सवय स्वत: ला लगेच लावा व मुलांनाही शिकवा.चूळ भरल्याने दातांमध्ये अडकलेले अन्नकण साफ होतात.वेळीच हे अन्नकण साफ न केल्यास दातांमध्ये जंतुसंसर्ग होतो व त्यामुळे दातांमधुन दुर्गंध येणे व हिरडयांच्या समस्या निर्माण होतात.

घरी आल्यावर लगेच हातपाय धुणे:
दिवसभरातील कामे करुन घरी आल्यावर (जर अंघोळ करणे शक्य नसेल) आपण हातपाय स्वच्छ धुतले पाहीजे.घराबाहेर असताना आपल्या चेहरा व हातापायांवर धुळीचे कण जमा होतात.ज्यामुळे पोटांचे विकार,श्वासाच्या समस्या व त्वचा विकार होण्याचा धोका असतो.

दिवा लावुन प्रार्थना करणे:
तुम्ही रोज घरी देवासमोर दिवा लावुन प्रार्थना करता का ? तुमच्या मुलांना तुम्ही ही चांगली सवय लावली आहे का? आपली संस्कृती व परंपरा जपण्यासाठी ही सवय मुलांना जरुर लावा.प्रार्थना किंवा गायत्रीमंत्रासारखे मंत्र मनाला शांत करतात.मुलांमध्ये स्मरणशक्ती व एकाग्रता वाढवातात.ह्रदयाला निरोगी ठेवतात,चिंता काळजी दुर करतात.डोळे बंद करुन ध्यानपुर्वक केलेली प्रार्थना तुमच्यामध्ये सकारात्मक विचार व अध्यात्मिक भावना निर्माण करते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Parenting Title: Every parent must teach their kids these good habits in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Parenting(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x