6 May 2024 9:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

युवासेनेच्या ‘त्या’ निष्ठावान जिल्हाध्यक्षाच्या नाराजीवर सरदेसाईंनी दाखवलं नैतृत्व कौशल्य | नेमकं काय घडलं?

Varun Sardesai

नाशिक, १० ऑगस्ट | जवळपास सर्वच पक्षांमध्ये निष्ठावंत कार्यकर्ते असतात पण प्रत्येकाला न्याय मिळतोच असे नाही. अनेकदा नवख्या आणि पब्लिसिटी तसेच समाज माध्यमांवर स्टन्ट करणारे पदाधिकारी पक्षातील वरिष्ठ नेत्यांमार्फत वशिल्याने पद मिळवून जुन्या पदाधिकाऱ्यांवर अन्याय करतात. पक्ष बांधणी करणारे पदाधिकारी अनेकदा चमकोगिरी पदाधिकाऱ्यांमुळे पक्षश्रेष्ठींच्या समोर येतं नाहीत. मात्र शिवसेनेची युवा शाखा असलेल्या युवासेनेचे राष्ट्रीय सचिव वरुण सरदेसाई मात्र निष्ठावंत कार्यकर्त्याला विसरले नाहीत. आणि मनधरणी करण्याचे कौशल्य त्यांनी दाखवून दिलं आहे. कोणत्याही नैत्रुत्वात हा गुण असणं महत्वाचं असतं.

त्याचं झालं असं की वरुण सरदेसाई ६ ऑगस्ट रोजी जळगावच्या दौऱ्यावर होते. दौऱ्यावर असतांना त्यांना युवासेनेचे जिल्हाध्यक्ष प्रीतेश ठाकूर नजरेस पडले नाहीत. त्यांनी ‘काही नवख्या’ कार्यकर्त्यांकडे विचारणा केली असता ठाकूर यांना आमंत्रण दिलं असल्याचं सांगितलं गेलं. मात्र असं काही आमंत्रण ठाकूर यांना मिळालं नव्हतं.

नाशिकमध्ये भेट घेतली:
वरुण सरदेसाईंसारख्या उमद्या नेत्यानं मात्र ही गोष्ट लक्षात ठेवली. आणि त्यांनी नाशिकात पोहचल्यावर प्रीतेश ठाकूर यांना बोलावून घेतले. नाशिकमध्ये सरदेसाई आणि ठाकूर या दोघांचीच बराच वेळ चर्चा झाली. या चर्चेचे काही फोटो देखील व्हायरल झाले. या भेटीनंतर प्रीतेश ठाकूर यांनी फेसबुक पोस्ट लिहित सरदेसाईंचं आभार मानलं. त्यांनी म्हटलंय की, मनासारखा नेता, नेत्या सारखं मन.. युवासेना राष्ट्रीय सचिव मा. वरुण जी सरदेसाई साहेब यांच्या सोबत नाशिक येथे भेट झाली. अतिशय आपुलकीने विचारपूस करून गुरू, मार्गदर्शक, मोठे भाऊ, नेते या सर्व भूमिका अत्यंत मनापासून निभवणारे सरदेसाई साहेब हे खऱ्या अर्थाने नेते आहेत. सर्व सामान्य कार्यकर्त्याच्या कामाची व प्रसंगी अडचणीची जाणीव ठेवून पाठीशी उभे राहून बळ देणारे नेते लाभण हीच भाग्याची गोष्ट आहे. मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी केलेल्या कामाची शाबासकी आहे, असं ठाकूर यांनी म्हटलं आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Yuva Sena secretary Varun Sardesai meet Jalgaon Yuva Sena Jilhadhyaksha Pritesh Thakur in Nashik news updates.

हॅशटॅग्स

#VarunSardesai(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x