मुंबई, १३ ऑगस्ट | महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या खासगी आणि कौटुंबिक कंपन्यांच्या “विकासा’प्रमाणेच मागील सरकारमधील भारतीय जनता पक्षाच्या माजी मंत्र्यांच्या कंपन्यांची संख्याही कमी नाही. माजी मंत्र्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात जाहीर केलेले व्यवसाय आणि त्यांच्या नावावर मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स या विभागाकडे दाखल कंपन्यांबाबत प्रसार माध्यमांनी पडताळणी केली. आघाडी सरकारमधील मंत्र्यांप्रमाणे मागील मंत्रिमंडळातही “शेती व उद्योग’ हाच व्यवसाय बहुतांश मंत्र्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केला होता. प्रत्यक्षात, ते संचालक असलेल्या कंपन्यांपैकी ३४% कंपन्या “उद्योग’ क्षेत्राशी संबंधित असल्याचे दिसते.
विविध कंपन्यांत संचालक असलेले माजी मंत्री:
१. आशिष शेलार ३ कंपन्या
२. परिणय फुके ३ कंपन्या
३. सुरेश खाडे ३ कंपन्या
४. प्रविण पोटे २ कंपन्या
५. डॉ अनिल बोंडे १ कंपनी
६. गिरिष महाजन १ कंपनी
७. डॉ. रणजीत पाटील १ कंपनी
८. प्रकाश मेहता १ कंपनी
आम्ही जनहितार्थ स्थापन केल्या कंपन्या:
शेतकऱ्यांच्या मालास बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने अॅग्रो इंडस्ट्रीची गरज होती. त्याच उद्देशाने आम्ही या कंपन्या स्थापन केल्या होत्या. यात भ्रष्टाचार नाही. काळ्या पैशाचाही मुद्दा नाही. आम्ही लोकहितासाठी या कंपन्या स्थापन केल्या असं बच्चू कडू म्हणाले.
टॉप ५ कंपनी माजी मंत्री; उद्योग, बांधकाम क्षेत्रात सर्वाधिक कंपन्या
पंकजा मुंडे-पालवे:
१४ कंपन्या (२ विद्यमान संचालक, १२ माजी संचालक/भागीदार)
जयकुमार रावल:
१० कंपन्या (९ विद्यमान संचालक, १ माजी संचालक)
अतुल सावे:
८ कंपन्या (७ कंपन्या स्वत:च्या नावाने, तर १ कुटुंबीयांची)
विनोद तावडे:
६ कंपन्या (या सर्व कंपन्यांत माजी संचालक)
देवेंद्र फडणवीस:
४ कंपन्या (२ सरकारी, २ खासगी, १ विद्यमान, ३ माजी संचालक)
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Many former BJP ministers having companies including Devendra Fadnavis news updates.
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		