15 May 2024 7:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

औरंगाबादेत युवासेनेच्या कार्यक्रमात तरुणांची तुफान गर्दी | कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर

Varun Sardesai

औरंगाबाद, १३ ऑगस्ट | औरंगाबादेत युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांच्या स्वागतासाठी आज (13 ऑगस्ट) तुफान गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. याआधी बीडलादेखील अशाच प्रकारे गर्दी झाली होती. कार्यक्रमात गर्दी झाली तर प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी असे सरदेसाई यांनीच यापूर्वी म्हटलं होतं.

शिवसेनेतर्फे युवा संवादाच्या माध्यमातून तरुणांशी संवाद साधला जातोय. या संवादाची पुण्यातून सुरुवात झाली. आता मराठवाड्यातसुद्धा अशाच पद्धतीने युवा संवादाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. यावेळी औरंगाबादेत युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांच्या स्वागतासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. तसेच येथे सोशल डिस्टन्सिंग आणि इतर कोरोना नियमांना हरताळ फासण्यात आला.

कार्यक्रमात गर्दी झाल्यास आमच्याविरोधात गुन्हा दाखल केला तरी आमची हरकत नसेल, असे वक्तव्य सरदेसाई यांनी केले होते. तसेच कार्यक्रमात कोणतीही गर्दी होऊ देणार नाही अशी हमी दिली होती. मात्र, प्रत्यक्षात कार्यक्रमात लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. तसेच येथे कोरोना नियमांचे लल्लंघन झाल्याचे पाहायला मिळाले. या सर्व प्रकारानंतर आता पोलीस प्रशासन कायद्याप्रमाणे कारवाई करणार का ? असा सवाल विचारला जात आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Corona rules violated in Aurangabad Yuvasena Sanvad Yatra news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x