18 May 2024 1:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL स्टॉकमध्ये तुफान तेजी, शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने धावतोय, फायदा घेणार? Wipro Share Price | विप्रो स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआऊटचे संकेत, मोठी कमाई होणार, टार्गेट प्राइस जाणून घ्या Ashok Leyland Share Price | मालामाल करणाऱ्या स्टॉकच्या खरेदीला ऑनलाईन गर्दी, तज्ज्ञांचा शेअर्स खरेदीचा सल्ला Infosys Share Price | इन्फोसिस शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक स्वस्तात विकत घ्यावा? Hold करावा की Sell करावा? Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR करताना 'या' 10 चुका टाळा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा Post Office Interest Rate | तुमच्या कुटुंबासाठी 'या' 3 पोस्ट ऑफिस योजना वरदान ठरतील, फायदे जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांसाठी खास SIP योजना नोट करा, महिना बचत देईल 1 कोटी 4 लाख रुपये परतावा
x

आजच्या घडीला दिल्लीपेक्षा महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटना अधिक - देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis

नवी मुंबई, १४ ऑगस्ट | दिल्लीत लहान मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. काँग्रेसने याघटनेच्या विरोधात दिल्लीत जोरदार आंदोलन केलं आहे. या आंदोलनात महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत हे देखील त्या आंदोलनात उपस्थित होते. यावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली असून, दिल्लीत डोकं वर काढून आंदोलन करायचं मात्र महाराष्ट्रात तोंड लपवत फिरायचं, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे.

नवी मुंबईत गणेश नाईक फाउंडेशनच्या वतीने व नवी मुंबई महानगरपालिकेला 9 रुग्णवाहिका, ग्रंथालयास एम.पी.एस.सी व यू.पी.एस.सी विद्यार्थ्यांसाठी पुस्तके तसेच जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात करमणुकीचे साहित्य पूरविणे या कामांचा लोकार्पण सोहळा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

दिल्लीत नऊ वर्षांच्या अल्पवयीन मुलींवर जो अत्याचार झाला ही घटना अंत्यत दुःखद असून,त्याचा आम्हीही निषेधचं करतो मात्र, दिल्लीत काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या नेतृत्वाखाली या घटनेच्या विरोधात जे धरणे आंदोलन करण्यात आले आहे हे निव्वळ ढोंग आहे. कारण आजच्या घडीला अशा घटना महाराष्ट्रात अधिक होत आहेत. मात्र महाराष्ट्रात अशा घटना घडलेल्या घटनास्थळी डॉ नितीन राऊत कधीही गेले नाहीत, किंवा महाराष्ट्रातील अशा घटनेतील पीडित परिवाराला भेटले देखील नाहीत ना अशा परिवारावर झालेल्या अन्यायाविरुद्ध ना आवाज उठविला ना स्वतःच्या सरकारला अशा घटनांचा जाब विचारला. मात्र तुम्ही उत्तर प्रदेश व दिल्लीला जाता, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. राज्य सरकारवर टीका करताना महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात होत असलेल्या महिला अत्याचाराचा पाढाच वाचला. यावेळी दिल्लीत डोकं वर काढून आंदोलन करायचं मात्र महाराष्ट्रात तोंड लपवत फिरायचं अशी जोरदार टीका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Crime related to women’s is more Maharashtra than Delhi said Devendra Fadnavis news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x