15 May 2021 11:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
आपला शत्रू एक बहुरूपी आहे, तो कपडे बदलून फोटो काढत असतो - सुरेंद्र राजपूत ऑक्सिजन गळती दुर्घटनेच्या १० दिवसांनी नाशिकमध्ये प्रकटलेले, पण चंद्रकांतदादा म्हणाले फडणवीस आणि मी.... कोणत्या फेक न्यूज फॉलो करते ही? | म्हणाली, समजलं की ते गंगा नदीतील नाही तर नाजयेरियातील फोटो राजकीय विरोधकांचा 'छळ' ही एकमेव 'टूलकिट' मोदी, शहा आणि आदित्यनाथ वापरतात - काँग्रेस राज्याला अधिक मदत द्या असं फडणवीसांकडून मोदींना एकही पत्र नाही, पण सोनिया गांधींना पत्र लिहिण्यास वेळ काढला फडणवीसजी सरकार लोकांचे जीव वाचविण्यात व्यस्त, तुम्ही भाजपची माशा मारण्याची स्पर्धा भरवत बसा - राष्ट्रवादी ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक - काँग्रेस
x

आज मराठी भाषा दिन; गर्व आहे मराठी असल्याचा

Marathi Rajbhasha Din 2020, Kavi Kusumagraj

मुंबई: मराठी भाषा ही महाराष्ट्र राज्याची राजभाषा आहे. दरवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जात असतो. या दिवसाचं औचित्य साधत राज्यात मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो.

BhagyaVivah Marathi Matrimonial

कुसुमाग्रज यांना १९८७ साली साहित्य विश्वातील मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य सरकारकडून कुसुमाग्रजांचा जन्मदिन हा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा करण्याला सुरूवात केली. कुसुमाग्रजांच्या विशाखा कवितासंग्रहाला हा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. यासोबतच कुसुमाग्रजांचा जन्म दिवस हा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा करण्यामागे जागतिक मराठी अकादमीनेदेखील पुढाकार घेतला आहे.

मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ रोजी पुणे येथे झाला. नाशिकमध्ये त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. बी.ए.ची पदवी मिळाल्यानंतर काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लिहणे, छोट्या भूमिका करणे अशी अनेक कामे केली. यानंतर विविध नियतकालिकांचे व वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले आहे. कुसुमाग्रज या टोपणनावाने देखील त्यांनी कवितालेखन केले आहे.

शालेय आणि महाविद्यालयीन पातळीवर मराठी भाषेचा अभ्यास करत असताना तो नुसता अभ्यास न राहता मराठी भाषेचे अध्ययन, वाचन, लेखन व आकलन हे स्वयं विकासासाठी करता आले पाहिजे. या दृष्टीने मराठी भाषेकडे पाहणे गरजेचे आहे. कारण अलिकडे मराठी भाषेचा योग्य ठिकाणी वापर करणारे रोजगार मिळवताना दिसताहेत. याची अनेक उदाहरणे देता येतील. निवेदन, सूत्रसंचालन, प्रवचन, निरूपण, कीर्तन, काव्यवाचन, कथाकथन, गीत लेखन, संहिता लेखन, बातमीलेखन, व्याख्यान, भाषांतर, अनुवाद यासारख्या अनेक बाबी साध्य करण्यासाठी मराठी भाषा व साहित्याचा उपयोग स्वयंविकास आणि रोजगार उपलब्धीसाठी करता येऊ शकतो.

 

News English Summery: Marathi is the official language of the state of Maharashtra. Every year, February 27 is celebrated as Marathi Rajbhasha Day. In order to justify this day, various programs are organized to enrich the Marathi language in the state. The birth anniversary of Marathi poet Vishnu Vaman Shirwadkar, the poet Kusumagraj, is celebrated as ‘Marathi language glory day’. Kusumagraj received the prestigious Jnanpith Award in the literary world in 1987. After this, in the state of Maharashtra, the state government started celebrating Kusumagraj’s birthday as Marathi Rajbhasha Day. Kusumagraj’s Vishakha Poetry Collection has received this Jnanpith Award. In addition to this, the World Marathi Academy has taken the initiative to celebrate Kusumagraj’s Birthday as Marathi Rajbhasha Day.

 

Web Title: Story Marathi Rajbhasha Din 2020 date a history of Kusumagraj.

हॅशटॅग्स

#Maharashtra(189)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x