29 March 2024 8:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 30 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर?
x

स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात? निलेश राणे

Former MP Nilesh Rane, CM Uddhav Thackeray, Balasaheb Thackeray

मुंबई: शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखामधून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करण्यात आली आहे. ‘वीर सावरकरांची ढाल, भाजपचा पुळका खोटा’ या मथळ्याखाली प्रसिद्ध अग्रलेखात देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर भाजप नेत्यांना लक्ष्य करण्यात आलं आहे. सावरकर हा विषय भाजपसाठी आदर किंवा श्रद्धेचा विषय नसून राजकारणाचा विषय बनल्याची टीका सामनामधून करण्यात आली आहे. सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत फडणवीसांनी लिहिलेल्या दोन पत्रांचं काय झालं? या पत्रांची केंद्रान दखल न घेणे हा महाराष्ट्राचा आणि वीर सावरकरांचा अपमान आहे, अशी टीकाही सामनामधून करण्यात आली आहे. याच अग्रलेखात राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही लक्ष्य करण्यात आलं आहे. २००२ पर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘तिरंगा ध्वज’ राष्ट्रध्वज का मानला नाही? असा सवाल अग्रलेखात विचारण्यात आला आहे.

शिवसेनेनं वीर सावरकरांच्या मुद्द्यावरून भाजपावर टीकेचे बाण सोडले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांची ‘ढाल’ करून भाजप हे नवराष्ट्रवादाचे राजकारण खेळते आहे. त्यामुळे शिवसेनेसमोर ‘पेच’ निर्माण होईल असे त्यांना वाटत असेल तर ते भ्रमात आहेत. शिवसेनेसमोर ‘पेच’ निर्माण होणार नाही, पण तुम्ही जे ढोंग उभे केले आहे त्या ढोंगाच्या पेकाटात मात्र नक्कीच लाथ बसेल. भाजपला वीर सावरकरांचा आलेला पुळका खोटा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

मात्र यावरून भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रतिप्रश्न केला आहे. यावर त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात??? की त्यांच्या अगोदर कोण ठाकरे होते??? अटक होऊ नये म्हणून आणी बाणीत स्व. इंदिरा गांधीजीशी मांडवल्ली केली बाळासाहेबांनी तो इतिहास लोकं विसरलेली नाही.

काय आहे नेमकं ट्विट?

 

 

News English Summery: However, BJP leader and former MP Nilesh Rane has questioned Chief Minister Uddhav Thackeray. He tweeted, “Was Bala Balasaheb in an independent fight? Or who was Thackeray before him? He did not forget the history of Balasaheb’s meeting with the late Indira Gandhi to prevent his arrest.

 

Web Title: Story BJP Leader Nilesh Rane criticized Shivsena chief Uddhav Thackeray.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x