29 April 2024 1:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत PSU Stocks | हा PSU शेअर बंपर तेजीत वाढणार, 2 महिन्यात होईल मोठी कमाई, काय म्हटलं तज्ज्ञांनी? IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर्स 30 दिवसात मोठी परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर IREDA Share Price | IREDA शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले, कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, फायदा घेणार?
x

आता मुलांची Google सर्च माहिती पालकांना मिळणार | मुलांच्या सेफ्टीसाठी 'सेफ सर्च' नावाचं फीचर

Google new Safe Search feature

मुंबई, १४ ऑगस्ट | गुगल आता 18 वर्षाहून कमी वयोगटातील युजर्ससाठी अनेक बदल करणार आहे. कंपनी गुगल अकाउंट्सबाबत बदल करणार आहे, जेणेकरुन लहान मुलांना ऑनलाईन फ्रॉडपासून वाचवलं जाईल. अनेक पालक मुलांमध्ये वाढत्या इंटरनेटच्या वापरामुळे काळजीत आहेत. त्यामुळे गुगलच्या या निर्णयामुळे आता पालकांना काहीसा दिलासा मिळू शकतो.

टेक कंपनी गुगलने बुधवारी आपल्या ब्लॉग पोस्टद्वारे ही माहिती दिली. कंपनी संवेदनशील कॅटेगरीतील जाहिराती अल्पवयीन मुलांना दाखवण्यापासून रोखण्यासाठी सुरक्षा उपायांचा विस्तार करेल, असं कंपनीने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं आहे.

कंपनी 18 वर्षाहून कमी वय असलेल्यांसाठी लिंगाच्या आधारे जाहिरातींवर रोख लावेल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, येणाऱ्या काही महिन्यात जागतिक स्तरावर हे अपडेट रोल आउट करण्यास सुरू करणार आहे. Google वर जाहिरातींसाठी अतिरिक्त सुरक्षा प्रदान करणं हे लक्ष्य असून वयानुसार जाहिराती दाखवण्यात येणार आहेत.

नियमानुसार, 13 वर्षाखालील मुलं एक स्टँडर्ड Google अकाउंट बनवू शकणार नाहीत. त्यांना लिमिटेड फीचर्ससह गुगल अकाउंट वापरण्याची सूट मिळेल. उदा. आता 13 ते 17 वर्ष वयोगटातील मुलं YouTube डिफॉल्ट अपलोडचा वापर करू शकतील. Google मुलांच्या सेफ्टीसाठी सेफ सर्च नावाचं फीचर आणणार आहे. यात मुलांचं गुगल अकाउंट कुटुंबियांसह लिंक असेल, ज्यात 13 वर्ष वयोगटातील मुलं साइन-इन करू शकतील. ते काय सर्च करतात, याची माहिती पालकांनाही मिळत राहील.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title:  What is google new Safe Search feature for kids news updates.

हॅशटॅग्स

#Google(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x