8 May 2024 1:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर लोअर रिस्क आणि हाय रिवॉर्ड झोनमध्ये, ही आहे पुढची टार्गेट प्राईस Penny Stocks | टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स, प्रतिदिन 10 ते 40 टक्केपर्यंत परतावा देत आहेत, खरेदी करणार? PSU Stocks | फ्री बोनस शेअर्स मिळणार! मालामाल करणारा सरकारी कंपनीचा मल्टिबॅगर शेअर खरेदी करा Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर्समध्ये मजबूत तेजी येणार, नवीन अपडेट येताच शेअर्सची खरेदी वाढली Reliance Infra Share Price | तज्ज्ञांकडून रिलायन्स इन्फ्रा शेअर्सचा सपोर्ट लेव्हल आणि ब्रेकआउट जाहीर, टार्गेट प्राईस जाहीर IRB Infra Share Price | पैसाच पैसा मिळेल! IRB इन्फ्रा शेअर तब्बल 115 टक्के परतावा देईल, शेअर्स खरेदीला गर्दी Bajaj Pulsar NS400Z | नवीन पल्सर NS400Z पेट्रोल सह E20 इंधनाने सुद्धा धावणार, पैशाची महाबचत
x

व्हिडिओ व्हायरल: भाजप आमदार राम कदमांच्या रक्षाबंधन कार्यक्रमात रेशनकार्ड, नंतर शिक्का व टिकमार्क?

मुंबई : भाजपचे स्वयंघोषित डॅशिंग आमदार तसेच प्रवक्ते राम कदम रोज नवनवीन वादात अडकताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रजा फाउंडेशन’कडून लोकप्रनिधींच्या कामगिरीचे सर्वेक्षण करण्यात आलं होत, तसेच लोकप्रनिधींच ते रिपोर्ट कार्ड सामान्य जनतेसाठी खुलं करण्यात आलं होतं. त्यात भाजपचे घाटकोपरचे आमदार राम कदम यांचा सुद्धा क्रमांक आला होता. परंतु तो क्रमांक खालून पहिला होता. त्याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा फेक व्हिडिओ शेअर करण्याचा पराक्रम सुद्धा करून झाला आणि त्यात सुद्धा खरा व्हिडिओ समोर आल्याने ते तोंडघशी पडले होते. आता ते मतदार संघात रक्षाबंधनाच्या नावाने अजून भलत्याच वादात अडकण्याची शक्यता आहे.

राम कदमांनी त्यांच्या मतदारसंघात रविवारी रक्षाबंदनाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्यासाठी मतदारसंघातील महिलांना निमंत्रित करताना रेशनकार्ड अनिवार्य केलं होत. परंतु विषय तेव्हा गंभीर होतो, जेव्हा एखाद्या सरकारी महत्वाच्या कागदपत्रावर एखादा आमदार रक्षाबंधनाच्या नावाने शिक्का किंवा टिकमार्क करतो. दुसरं म्हणजे स्वतःच्या खाजगी कार्यक्रमात, त्यांनी महिलांना एखादा सरकारी दस्तावेज का आणण्यास सांगितला? तो काही सरकारी कार्यक्रम वा सरकारी नोंदणी असं काही नव्हतं. स्वतःचे खाजगी कार्यक्रम साजरे करताना सामान्यांनी सोबत आणलेल्या सरकारी कागदपत्रांवर शिक्के किंवा टिकमार्क करण्याचा अधिकार आमदार राम कदमांना कोणी दिला?

संबंधित ठिकाणी काही महिला समाजसेवकांनी चौकशी केली असता, तिथल्या उपस्थित महिलांनीच त्याचा उलघडा केला आणि ते व्हिडिओ मध्ये सुद्धा स्पष्ट दिसत आहे. जेव्हा त्या महिला समाजसेवकांनी रेशनकार्ड तसेच त्यावरील शिक्के किंवा टिकमार्क करण्याच्या प्रकाराबद्दल विचारले असता आमदार राम कदमांच्या कार्यकर्त्यांनी त्या महिला समाजसेवकांशी सुद्धा हुज्जत घातल्याचं या व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसत आहे. आज रक्षाबंदनाच्या नावाने मतदारसंघातील महिलांकडून रेशनकार्ड मागितले, उद्या आधार कार्ड, पॅनकार्ड वा पासपोर्ट काही सुद्धा मागतील आणि अशी शक्यता नाकारता येत नाही. परंतु सुज्ञ नागरिकांनी तसेच मतदारांनी, त्यांची खाजगी सरकारी कागदपत्र वा दस्तावेज अशा राजकीय कार्यक्रमात घेऊन जाणं टाळावं अशी अपेक्षा सुशिक्षित मतदार व्यक्त करत आहेत.

नक्की काय घडलं होते त्याचा सविस्तर व्हिडिओ;

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x