8 May 2024 2:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा? IRFC Vs IREDA Share Price | PSU शेअर्स तुफान तेजीत धावणार? IRFC आणि IREDA स्टॉकची जोरदार खरेदी सुरु GTL Share Price | स्वस्त GTL शेअर रॉकेट तेजीने धावणार, कंपनीकडून सकारात्मक बातमी आली, किती फायदा? Suzlon Share Price | सुझलॉन शेअर लोअर रिस्क आणि हाय रिवॉर्ड झोनमध्ये, ही आहे पुढची टार्गेट प्राईस Penny Stocks | टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स, प्रतिदिन 10 ते 40 टक्केपर्यंत परतावा देत आहेत, खरेदी करणार?
x

सेना आमदार किणेकरांविरुद्ध अंबरनाथमध्ये संताप वाढत आहे? यापूर्वी सुद्धा त्यांना भीमनगर परिसरात महिलांनी घेरलं होत: VIDEO

अंबरनाथ : शिवसेनेचे अंबरनाथमधील आमदार बालाजी किणेकरांविरुद्ध स्थानिकांमध्ये दिवसेंदिवस रोष वाढताना दिसत आहे. शहरातील खराब रस्त्यांना कंटाळल्यामुळे शहरात त्यांच्याविरुद्ध होर्डिंगबाजी सुरु झाली आहे. शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, त्याचा सामान्यांना प्रचंड त्रास होत आहे.

शहरातील रस्त्यावरून ना धड चालू शकत, ना वाहन घेऊन जाऊ शकत इतकी रस्त्यांची बिकट अवस्था झाली असल्याने शहरातील सामान्य हवालदिल झाले असून ते स्थानिक आमदार तसेच खासदारांवर रोष व्यक्त करत आहेत. त्याचाच प्रत्यय असा की, शिवसेना आमदार बालाजी किणेकरांविरुद्ध शहरात होर्डिंगबाजी सुरु झाली आहे.

यापूर्वी सुद्धा अंबरनाथच्या भीमनगर परिसरातील स्थानिक महिलांनी त्यांना घेराव घातला आणि आमदार येथे दहा वर्ष फिरकलेच नसल्याचा संताप व्यक्त केला. भीमनगर परिसरातील महिलांनी त्यांना शिवीगाळ करत आपला संताप व्यक्तं केला. शिवसेना आमदार बालाजी किणीकर दहा वर्ष झाली परंतु अंबरनाथच्या भीमनगर परिसरात फिरकले सुद्धा नाहीत. त्यामुळे जेंव्हा ते आल्याचे समजले तसं लगेचच भीमनगर परिसरातील स्थानिक महिलांनी त्यांना घेराव घातला आणि चांगलेच धारेवर धरले. स्थानिक महिलांनी त्यांना चांगलेच सुनावल्याने आमदार बालाजी किणीकर यांना गप्प बसण्या शिवाय दुसरा मार्गच सुचला नाही. त्यांचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला होता.

विडिओ: कसं घेरलं होत तेव्हा शिवसेना आमदार किणेकरांना अंबरनाथच्या भीमनगर परिसरातील स्थानिक महिलांनी?

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x