18 April 2024 1:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Infosys Share Price | भरवशाच्या इन्फोसिस शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांनी किती दिली टार्गेट प्राईस? Senco Gold Share Price | सोनं विसरा! या सोन्याच्या कंपनीचा शेअर श्रीमंत करेल, 3 दिवसात 30% परतावा दिला, फायदा घ्या IRFC Share Price | IRFC शेअर्स मोठी उसळी घेणार, अल्पावधीत करणार मालामाल, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट Guru Rashi Parivartan | गुरु राशी परिवर्तन 'या' 3 राशींसाठी वरदान ठरणार, तुमची नशीबवान राशी आहे यामध्ये? Hyundai Exter Price | लोकांची आवडती SUV बुकिंगसाठी गर्दी, सर्व व्हेरियंटसह वेटिंग पीरियड आणि प्राईस नोट करा EPF Withdrawal Online | नोकरदारांसाठी खुशखबर! EPFO ने पैसे काढण्याचे नियम बदलले, आता दुप्पट पैसे काढू शकता Nippon India Mutual Fund | पगारदारांनो! या म्युच्युअल फंड योजना 46 टक्केपर्यंत परतावा देत आहेत, येथे पैसा वाढवा
x

संधी मिळेल तिथे फोटोशॉप? वाजपेयींच्या अस्थी विसर्जनावेळी तो 'अदृश्य हात' कोणाचा?

नवी दिल्ली : काल भारतीय जनता पार्टीचे दिल्लीचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचं यमुना नदीत विसर्जन केलं. त्यानंतर त्यांनी या अस्थिविसर्जनाचे फोटो ट्विट करत शेअर केले खरे, परंतु आता त्यावरून नेटीझन्सने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. कारण शेअर केलेल्या फोटोमध्ये मोडतोड केल्याचे समोर येत आहे. परंतु ते करण्यामागचा मूळ उद्देश तरी काय होता ते समजण्या पलीकडचं आहे.

मनोज तिवारी यांनी शेअर केलेल्या या अस्थिविसर्जनाच्या फोटोमध्ये तिवारी यांच्यासह भाजपाचे नेते बोटीवर स्पष्ट दिसत आहेत. परंतु तिवारी यांनी शेअर केलेल्या एका फोटोत बोटीतून बाहेर आलेला ‘तो’ हात नेमका कोणाचा यावरून समाज माध्यमांवर चर्चा रंगली आहे. इतकेच नाही तर अस्थिविसर्जन केल्यावर या बोटीतून बाहेर आलेल्या हातानं पाण्याला स्पर्श केल्याचंही फोटोत दिसत आहे.

परंतु जोश मध्ये शेअर केलेल्या या ४-५ फोटोमुळे ते जाणीव पूर्वक करण्यात आलं होत का? असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. एका फोटोत तिवारी अस्थी कलश रिकामा करताना दिसत आहेत. या फोटोत ‘तो’ हात कुठेही दिसत नाहीत. मात्र अस्थी कलश रिकामी केल्यानंतरच्या फोटोत ‘तो’ हात अगदी स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे आधी न दिसणारा ‘तो’ हात नंतर अचानक कुठून आला, याची चर्चा सध्या समाज माध्यमांवर रंगली आहे.

जर पहिल्या फोटोचे निरीक्षण केले तर असं दिसेल की वास्तविक त्या बोटीवर कोणताही होल नाही. परंतु दुसऱ्या फोटोमध्ये त्याच बोटीतून एका होल’मधून हात बाहेर येऊन पाण्याला स्पर्श करताना दिसत आहे. त्यामुळे मनोज तिवारी यांनी शेअर केलेला दुसरा फोटो हा मोडतोड केल्याची खात्री पटत आहे.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x