6 May 2024 9:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | IPO आला रे! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, GMP धुमाकूळ घालतेय, संधी सोडू नका Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार
x

Health First | 'ही' फळे फ्रीजमध्ये ठेवणे टाळा अन्यथा | कारणे वाचा

Refrigerating these fruits not beneficial

मुंबई, २१ ऑगस्ट | अनेकजन भाज्यासोबत फळ देखील फ्रीजमध्ये ठेवतात. असे केल्यास फळ बराच वेळ ताजी राहून खराब होणार नाही असे त्यांना वाटते. परंतु असे काही नसते. उलट फळे फ्रीजमध्ये ठेवल्यास आरोग्यास धोकादायक ठरू शकते. फळे फ्रीजमध्ये ठेवणे चुकीचे (Refrigerating these fruits not beneficial) आहे. अनेक फळे फ्रीजमध्ये ठेवल्याने खराब होतात. रसाळ फळे फ्रीजमध्ये ठेवणे टाळावे. अशी फळे फ्रीजमध्ये ठेवल्यास आरोग्यास फायदा होण्याएवजी नुकसानच होऊ शकते. आज जाणून घेऊया कोणती फळे फ्रीजमध्ये ठेवावी.

काही फळे फ्रीजमध्ये ठेवल्यास आरोग्यास धोकादायक ठरू शकते (Refrigerating these fruits not beneficial for health) :

केळी:
हे फळ चुकूनही फ्रीजमध्ये ठेऊ नका. फ्रीजमध्ये ठेवल्यास फळे काळी पडू शकतात. हे फळ फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यातील इथिलीन गॅस बाहेर पडतो. त्यामुळे फ्रीजमधील इतर फळे लवकर पिकतात. म्हणूनच केली कधीच फ्रीजमध्ये ठेवू नये.

टरबूज- खरबूज:
टरबूज या फळात मुबलक प्रमाणात पाणी असते. यामुळे उन्हाळ्यात हे फळ भरपूर प्रमाणात खाल्या जाते. परंतु हे फळ आकाराने खूप मोठे असल्याने एकाच वेळी संपवणे कठीण असते. या वेळी बरेच लोक टरबूज- खरबूज हे फळ कापल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवतात. असे करणे चुकीचे आहे. टरबूज – खरबूज यासारखी रसाळ फळे कापून फ्रीजमध्ये ठेवणे टाळावे. हे फळ फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यातील अँटीऑक्सिडंट नष्ट होण्याची शक्यता असते. परंतु तुम्हाला हे फळ जर थंड करून खायचे असेल तर तुम्ही थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेऊ शकता .

सफरचंद:
सफरचंद हे फळ आरोग्यास लाभदायी असते. हे फळ फ्रीजमध्ये ठेवल्यास लवकर पिकू शकते. सफरचंदात असलेल्या एन्झाईम्समुळे ते वेगाने पिकते. यामुळेच ते काळे देखील पडू शकते. सफरचंद फ्रीजमध्ये ठेवणे टाळावे. या फळाला जास्त वेळ टिकून ठेवायचे असेल तर त्याला कागदात ठेवावे. तसेच बिया असणारी फळे जसे की, चेरी , पीच हे देखील फळ फ्रीजमध्ये ठेवणे टाळावे.

आंबा:
फळांमध्ये आंबा हे फळ फळांचा राजा म्हणून ओळखला जातो. आंबा फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यातील अँटीऑक्सिडंट कमी होऊ शकतात. यामुळेच त्या फळातील पोषाक तत्वे नष्ट होतात. या फळाला कार्बाईडनेपिकवल्या जाते. यामुळेच कार्बाईड पाण्यात मिसळल्यास हे फळ लगेच खराब होऊ शकते.

लिची:
लीची हे फळ चवीला कुप स्वादिष्ट असते. पण चुकूनही हे फळ फ्रीजमध्ये ठेऊ नका. लीची फळाला फ्रीजमध्ये ठेवल्यास ते वरुण त चांगले राहते परंतु त्याचा आतील भाग खराब होऊ शकतो. त्यामुळेच फळ खाण्या योग्य देखील राहत नाही.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Refrigerating these fruits not beneficial for health.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x