1 December 2022 8:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quick Money Share | झटपट पैसा! या शेअरने 3 महिन्यांत 147 टक्के परतावा दिला, वेगाने पैसे वाढवत आहे हा स्टॉक, नोट करा Money From IPO | हा IPO दुसऱ्या दिवशी 6 पट सबस्क्राइब झाला, ग्रे मार्केटमध्ये 55 रुपयांचा प्रीमियम, मोठ्या कमाईचे संकेत Equity Mutual Fund | इक्विटी फंडात पैसे गुंतवता? चांगले फंड कसे निवडावे आणि खराब फंडमधून कधी बाहेर पडावे? जाणून घ्या Talathi Bharti 2022 | राज्यात 4122 जागांसाठी तलाठी महाभरती, त्वरित ऑनलाइन अर्ज करा PCMC Recruitment 2022 | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 285 पदांची भरती, पटापट अर्ज करा Penny Stock | अपना सपना मणी मणी! या पेनी शेअरने 50 हजारावर 5 लाख परतावा दिला, अजून 35 टक्के वाढणार, नोट करा Quant Mutual Fund | तुम्हाला पैसा 5 पट करायचा आहे? क्वांट म्युच्युअल फंडाच्या टॉप 5 योजना सेव्ह करा, व्हा श्रीमंत
x

Viral Video | महिलेवर सी-लायनचा अचानक हल्ला, गप्पा मारत असताना पाण्यात खेचलं, व्हायरल व्हिडिओ पहा

Viral video

Viral Video | सोशल मीडियावर सर्व प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात. त्यातले काही अगदी गमतीदार तर काही इतके घातक असतात की, कुणालाही ते धक्कादायक वाटू शकतात. आता असाच आणखी एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये समुद्राच्या पाण्यात उभ्या असलेल्या जहाजासारखे काही दिसत आहे. त्याचवेळी जहाजाच्या बाजूला बसून एक महिला स्वत:चे काही फोटो काढत असते. त्यावेळी अचानक घडलेल्या एका प्रकारची समाज माध्यमांवर जोरदार चर्चा सुरु आहे आणि त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल होतं आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण :
तुम्ही समुद्रातील सी लायनबद्दल ऐकलं असेलच. हे प्राणी दिसायला दिसतात तितके सामान्य नसतात. पृथ्वीच्या सिंहाप्रमाणेच समुद्रातील सिंह हा देखील अत्यंत धोकादायक प्राणी मानला जातो. सी-लायन समुद्रात लहान मासे आणि ऑक्टोपस इत्यादींची शिकार करतो. मात्र, काही वेळा ते मानवासाठीही धोक्याचे असल्याचे दिसून आले आहे. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये सी-लायन एका महिलेवर हल्ला करताना दिसत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला दिसेल की, ती महिला समुद्री जहाजावर बसून तिच्या मागे असलेल्या पाण्यात सी-लायनसोबत फोटो काढत आहे. त्यासाठी ती जहाजाच्या बाजूला गेली असता अचानक सी-लायन पाण्यातून बाहेर आला आणि त्याने अत्यंत वेगाने हल्ला केला आणि महिलेला अचानक समुद्राच्या पाण्यात खेचलं. त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या इतर लोकांच्या किंकाळ्या बाहेर पडल्या. क्षणभर तिथे काय घडलं हे कुणालाच समजलं नाही.

सी-लायन एका झटक्यात त्या स्त्रीला आपल्यासोबत पाण्यात कसे ओढते ते तुम्ही पाहू शकता. हा हल्ला अतिशय शक्तिशाली होता. सुदैवाने तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने विनाविलंब त्या महिलेला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली आणि दोघेही वेळीच पाण्यातून बाहेर आले.

येथे पाहा व्हिडिओ :

व्हायरल झालेला व्हिडिओ कधी आणि कुठे आहे, याबाबत काहीही सांगणे कठीण आहे. 4 तारखेला @ViciousVideos ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 91 हजाराहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर काही लोकांना हा व्हिडिओ पाहून आश्चर्याचा धक्का बसला आहे, तर अनेक लोकही खूप घाबरले आहेत. युझर्सचं म्हणणं आहे की, वेळीच पुरुषाने महिलेचा जीव वाचवला, अन्यथा ज्या प्रकारे प्राण्याने महिलेला पाण्यात खेचलं, ते पाहिल्यानंतर स्पष्टपणे म्हणता येईल की, त्याला तिचा नाश्ता बनवायचा होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral video of sea lion attack on woman video gone viral on social media check details 06 August 2022.

हॅशटॅग्स

#Video Viral(56)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x