9 October 2024 4:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | जबरदस्त कमाई होणार, वेदांता कंपनीबाबत अपडेट, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन शेअर ओव्हरसोल्ड झोन जवळ, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, तज्ज्ञांनी दिला सल्ला - Marathi News Jio Finance Share Price | मालामाल करणार जिओ फायनान्शियल शेअर, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News TTML Share Price | 2975% परतावा देणारा TTML शेअर पुन्हा फोकसमध्ये, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी - Marathi News Vodafone Idea Share Price | 9 रुपयाचा पेनी शेअर 3 महिन्यात 43% घसरला, पुढे काय, स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचे तिकीट बुक करण्याआधी एक काम करा, स्लीपर कोचच्या पैशात AC मधून प्रवास कराल IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअर आला फोकसमध्ये, 343% परतावा देणारा स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News
x

तर मी राम मंदिरही बांधायला जाईन, साध्वी प्रज्ञा सिंह.

औरंगाबाद : जशी बाबरी पडायला गेली होती तशी मी राम मंदिरही बांधायला जाईन असे धक्कादायक विधान साध्वी प्रज्ञा सिंह ने केले आहे. त्या औरंगाबाद येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक राष्ट्रभक्त असून ते इतरांपेक्षा वेगळं आणि चांगले काम करत आहेत. राम मंदिर ही सर्व जनमानसाची भावना आहे असं ही साध्वी प्रज्ञा सिंह पत्रकारांना संबोधित करताना म्हणाल्या.

साध्वी प्रज्ञा सिंह या मालेगाव बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी होत्या आणि त्यांना काही वर्ष शिक्षाही झाली होती. कालांतराने त्यांची त्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. १९९२ रोजी बाबरी मशिद पडल्यावर देशभरात मोठ्या जातीय दंगली उसळल्या होत्या. बाबरी मशिद आणि रामजन्मभूमी हा वाद जवळजवळ १२० वर्ष जुना असून सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून त्यावर लवकरच निकाल लागेल अशी शक्यता आहे. त्याला अनुसरूनच साध्वी प्रज्ञा सिंह यांनी हे असे विधान केले की, लवकरच राम मंदिर उभं राहील आणि ते बांधायला आपण जाऊ असा आशावाद साध्वी प्रज्ञा सिंह यांनी व्यक्त केला आहे.

हॅशटॅग्स

#Sandvi Pradnya Singh(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x