29 April 2024 12:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

ठाणे न्यायालयाने गजानन काळे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला | अटक अटळ

Raj Thackeray

पारनेर, २१ ऑगस्ट | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबईचे शहराध्यक्ष गजानन काळे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे गजानन काळे यांच्या अडचणीत आता चांगलीच वाढ झालीय.

ठाणे न्यायालयाने गजानन काळे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला (MNS Leader Gajanan Kale’s bail application rejected by Thane court)

दरम्यान, काळे यांच्या शोधासाठी नवी मुंबई पोलिसांची 15 पथकं विविध भागात रवाना झाली आहेत. असं असलं तरी अद्याप गजानन काळेचा शोध लागू शकलेला नाही. काळे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून त्यांचा मोबाईल बंद आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काळे नवी मुंबई शहराबाहेर आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी 15 पथकं रवाना केली आहे. दरम्यान, काळेला लवकरात लवकर अटक केली जाईल, असा दावा पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग यांनी केलाय. (MNS Leader Gajanan Kale’s bail application rejected by Thane court)

दरम्यान, गजानन काळे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या त्यांच्या पत्नी संजीवनी काळे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली. र्मिला वहिनींनी माझी सर्व बाजू ऐकून घेतली. त्या मला नक्की न्याय देतील, अशी प्रतिक्रिया संजीवनी काळे यांनी दिली. काही दिवसांपूर्वी संजीवनी काळे यांनी आपल्या पतीवर घरगुती हिंसाचार व जातीवाचक शेरेबाजीचा खळबजनक आरोप केला होता. त्यानंतर नेरुळ पोलीस ठाण्यात गजानन काळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून गजानन काळे फरार आहे.

 

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: MNS Leader Gajanan Kale’s bail application rejected by Thane court news updates.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x