30 April 2024 12:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

UP Election 2022 | समाजवादी पक्षाचे 'ब्राह्मण' राजकारण कार्ड | तर परशुरामाचे पुतळे उभारून !...

Uttar Pradesh Assembly Election 2022

लखनौ, २२ ऑगस्ट | अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ब्राह्मण समाजाचे लांगूलचालन चालविले आहे पण त्यांच्यासाठी कोणती विकास योजना आणून नव्हे, तर भगवान परशुरामाचे पुतळे जिल्ह्या – जिल्ह्यांमध्ये उभारून हे लांगूलचालन चालविले आहे. बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी उत्तर प्रदेशात ब्राह्मण महासंमेलने आयोजनाचा सपाटा लावल्यानंतर त्यांना काटशह देण्यासाठी समाजवादी पक्षाने भगवान परशुराम पुतळे उभारण्याची योजना सुरू केली आहे.

मायावती यांनी उत्तर प्रदेशात ब्राह्मण महासंमेलने आयोजनाचा सपाटा लावल्यानंतर समाजवादी पक्षाने भगवान परशुराम पुतळे उभारण्याची योजना सुरू केली आहे (Samajwadi Party To Install 108 Feet Bhagwan Parashuram Statue In Lucknow For Brahmin Votes) :

3 ऑक्टोबर महिन्यात लखनौत भगवान परशुरामाचा १०८ फुटी पुतळा उभारण्याचा भव्य कार्यक्रम होणार असून त्याला पश्चिम बंगालच्या कायस्थ ब्राह्मण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या उपस्थित राहणार आहेत. यासाठी जागाही निश्चित करण्यात आली असून पूर्वांचल एक्सप्रेस वे वर मौरा गावानजीक दोन बिघे जमीन देखील निश्चित करण्यात आली आहे. प्रख्यात मूर्तिकार राजकुमार पंडित यांना परशुराम पुतळा तयार करण्याचे काम देण्यात आले. हा ब्राँझचा १०८ फुटी पुतळा असेल. राजकुमार पंडित यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा लखनौतला भव्य पुतळा घडविला आहे.

समाजवादी पार्टीचे ब्राह्मण नेते आणि लंभुआचे माजी आमदार संतोष पांडेय यांचे चिरंजीवी भगवान परशुराम चेतना पीठ भगवान परशुरामांचा हा पुतळा उभारणार आहे. या पीठाने आतापर्यंत मेरठ जिल्ह्यातील हस्तिनापुर, आग्रार, जौनपूर, प्रयागराज, बुलंदशहर, हापुड़, गाजियाबाद, श्रावस्ती या शहरांमध्ये 11 फुटांपासून ते 31 फुटांपर्यंतचे भगवान परशुरामांचे पुतळे उभारले आहेत. गाजियाबाद जिल्ह्यातील वसुंधरा आणि साहिबाबादमध्ये नवीन रस्त्यांवर भगवान परशुराम चौक बांधण्यात आले आहेत. (Samajwadi Party To Install 108 Feet Bhagwan Parashuram Statue In Lucknow For Brahmin Votes)

चिरंजीवी भगवान परशुराम चेतना पीठ उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीपूर्वी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये भगवान परशुरामांचे मंदिरे बांधणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ वाराणसी, जौनपूर, भदोही, प्रतापगढ़, श्रावस्ती, गोंडा, महाराजगंज, बस्ती, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मतदारसंघ गोरखपूर, फैजाबाद आणि सुलतानपुर या शहरांमध्ये देखील भगवान परशुरामांचे पुतळे उभारण्याचे काम जोरात सुरू आहे. या सर्व ठिकाणी पुतळा उभारणीसाठी जमीन निश्चित करण्यात आली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Samajwadi Party To Install 108 Feet Bhagwan Parashuram Statue In Lucknow For Brahmin Votes news updates.

हॅशटॅग्स

#UttarPradeshAssemblyElection2022(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x