5 May 2024 11:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

कायद्याप्रमाणे सर्व गोष्टी होतील, राणेंना अटक करुन कोर्टात हजर केलं जाईल, जे सांगायचं ते कोर्टात सांगा - नाशिक पोलीस आयुक्त

Narayan Rane

नाशिक, २४ ऑगस्ट | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुख्यमंत्र्यावर केलेल्या वक्तव्याप्रकरणी नारायण राणेंना अटक करण्याचे आदेश नाशिक पोलिसांकडून देण्यात आले आहेत. नारायण राणें यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कानाशिलात लगावण्याचे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांना बोलायचा अधिकार आहे का, बाजूला एखादा सेक्रेटरी ठेवावा आणि मग माहिती घेऊन बोलावे, अशी टीका नारायण राणे यांनी केली होती.

नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल, नाशिक पोलिसांचे पथक नारायण राणेंच्या अटकेसाठी रवाना – Nashik police commissioner Deepak Pandey statement over Narayan Rane arrest :

नाशिक पोलिसांचे पथक नारायण राणेंच्या अटकेसाठी रवाना झाले आहे. राणेंची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. आज चिपळूणमध्ये त्यांच्या यात्रेला सुरुवात होईल. तिथेच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नाशिक पोलीस आयुक्त अटकेचे आदेश काढायला राष्ट्रपती आहे की पंतप्रधान अशी विचारणाही राणेंनी केली.

यावर नाशिक पोलीस आयुक्त यांनी सविस्तर कायदेशीर प्रक्रिया सांगितली. संविधानानुसार गुन्हेगारी कायद्यांतर्गात राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना वगळता अटकेची कारवाई करता येते असं त्यांनी सांगितलं.

नाशिक पोलीस आयुक्त काय म्हणाले?
विविध कलमांतर्गत नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांचं विधान गंभीर आहे. त्याविरोधात तक्रार आली. तक्रारदारांची भावना दुखावल्याचं नमूद आहे. त्यामुळे नारायण राणेंना अटक करण्यासाठी पथक रवाना झालं आहे. कायद्याप्रमाणे सर्व गोष्टी होतील. राणेंना अटक करुन न्यायालयात हजर केलं जाईल, न्यायालय जो आदेश देईल त्यानुसार पुढील कारवाई होईल.

राणे हे राज्यसभेचे सदस्य आहेत. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष आहेत. त्यांना अटकेनंतर माहिती दिली जाईल. संबंधित जिल्हा दंडाधिकारी, न्याय दंडाधिकारी त्यांना माहिती दिली जाईल. राष्ट्रपती आणि राज्यपाल या दोघांनाच संविधानात क्रिमिनल केसेसमध्ये अटकेची कारवाई करता येत नाही. बाकीच्यांना मुभा नाही. या केसमध्ये फॅक्ट ऑफ द केस पाहून ही कारवाई करण्यात येत आहे.

गुन्ह्याचं गांभीर्य पाहून माननीय साहेबांना पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून अटकेसाठी पथक रवाना झालं आहे. आदेश अटकेचे दिले आहेत. अटक करणे हा महत्त्वाचा भाग नाही, पुनरावृत्ती होऊ नये हे महत्त्वाचं आहे. राणेंनी आपलं निर्दोषत्व न्यायालयात सिद्ध करावं.

काय म्हणाले होते नारायण राणे?
मुख्यमंत्र्यांना कोण सल्ला देतो हे त्यांनाच कळत नाही. ते आम्हाला काय सल्ला देणार, ते काय डॉक्टर आहेत? तिसऱ्या लाटेचा त्यांना कुठून आवाज आला, अपशकुनासारखं बोलू नको म्हणावं. त्याला बोलायचा अधिकार तरी आहे का? बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव आणि बोल म्हणावं. त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून? अरे हीरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्यदिनाची तुम्हाला माहिती नसावी, या शब्दांत राणेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Nashik police commissioner Deepak Pandey statement over Narayan Rane arrest news updates.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x