6 May 2024 4:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या IPO GMP | सुवर्ण संधी! मालामाल करणारा IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी मिळेल मल्टिबॅगर परतावा? Alok Industries Share Price | शेअर प्राईस 26 रुपये! कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा, आता गुंतवणूकदारांची चिंता वाढणार? Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स मिळणार, 700 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी शेअर्सची लिस्ट, अल्पावधीत मालामाल Tata Power Share Price | टाटा पॉवर स्टॉक चार्टमध्ये 'या' प्राईसवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली
x

VIDEO | मला मारण्याची भाषा हे संबधित पोलीस करत आहेत | आ. नितेश राणेंचा आरोप

MLA Nitesh Rane

मुंबई, २४ ऑगस्ट | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधातील वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना चांगलेच भोवले आहे. पुणे, रायगड आणि नाशिक येथील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्र्यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पुणे आणि नाशिक पोलिसांनी त्यांच्या अटकेसाठी वॉरंट जारी केले आहे. पुण्यातील चतुश्रुगी पोलिस ठाण्याचे एक पथक रायगडमधील चिपळूणला रवाना झाले आहे. असे सांगितले जात आहे की ही टीम नारायण राणे यांना अटक करणार आहे. भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेमध्ये सहभागी असलेले नारायण राणे सोमवारपासून येथेच आहेत.

मला मारण्याची भाषा हे संबधित पोलीस करत आहेत, आ. नितेश राणेंचा आरोप – Prevented MLA Nitesh Rane from going to Ratnagiri alleged to be using killing language :

राणे हे राज्यसभेचे खासदार आहेत, त्यामुळे पोलिसांना प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल. अटकेनंतर ही माहिती राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना दिली जाईल. पोलिस त्यांना हिंदीत किंवा इंग्रजीत ही माहिती देतील. राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसैनिक आक्रमक दिसत आहेत. नाशिकमधील भाजप कार्यालयावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेकही केली.

दरम्यान, भाजपा आमदार नितेश राणे यांना पोलिसांनी रत्नागिरीच्या सीमेवरच रोखलं आहे. नितेश राणे यांनी ट्विटरला व्हिडीओ ट्वीट करत ही माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी पोलिसांकडे कोणताही लेखी आदेश नसल्याची तक्रार केली असून राज्य सरकारवर निशाणा साधला. मला मारण्याची भाषा पोलिसांकडून केली जात असल्याचा आरोपही यावेळी नितेश राणे यांनी केला आहे.

मी माझ्या पद्धतीने रत्नागिरीच्या दिशेने जात होता. पोलीस मला आणि अन्य सामान्य नागरिकांना आपल्या कामासाठी रत्नागिरीला जायला देत नाही. यांच्याकडे कुठल्याही लेखी पद्धतीचा आदेश नाही. सामान्य नागरिकांना थांबवण्याचं काम पोलीस खात्यामार्फत केलं जात आहे. मला मारण्याची भाषा हे संबधित पोलीस करत आहेत याची दखल आपण घ्यावी. ज्या पद्धतीने सरकार काम करत आहे त्याची सर्व माहिती द्यावी यासाठी हा व्हिडिओ करत होतो,” असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Prevented MLA Nitesh Rane from going to Ratnagiri alleged to be using killing language news updates.

हॅशटॅग्स

#Nitesh Rane(100)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x