2 May 2024 2:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला! पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी मिळू शकतो मल्टिबॅगर परतावा Vedanta Share Price | वेदांता शेअर्समध्ये मजबूत तेजी, स्टॉकने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, आता रु.500 पार होणार? Yes Bank Share Price | तज्ज्ञांकडून येस बँक शेअर्सची रेटिंग जाहीर, चिंता वाढली, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 8 शेअर्स खरेदी करू शकता, मालामाल करणाऱ्या 10 पेनी शेअर्सची यादी Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड आणि टाटा मोटर्ससहित हे टॉप 5 शेअर्स तगडा परतावा देणार, खरेदीला ऑनलाईन गर्दी Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सवर 'बाय' रेटिंग, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर Reliance Home Finance Share Price | शेअर प्राईस 4 रुपये, हा स्वस्त स्टॉक पुन्हा चर्चेत आला, शेअर्स खरेदी वाढणार?
x

धार्मिक टीकेसाठी सोशल मीडियावर १ वर्षापूर्वीचे फोटो व्हायरल | नेहमीप्रमाणे भातखळकर अग्रस्थानी

Aaditya Thackeray

मुंबई, ०८ सप्टेंबर | वरळीमध्ये एका मोठ्या हिरव्या रंगाच्या कटआऊटवर आदित्य ठाकरेंचा सफेद रंगाचा कुर्त्यामधला फोटो व्हायरल झाला आहे. फोटोच्या शेजारी ऊर्दू भाषेत ‘नमस्ते वरळी’ असा संदेश लिहिला आहे. आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य प्रीती शर्मा मेनन यांनी हा फोटो टि्वट करत ‘भगवा झाला हिरवा’ असा संदेश लिहिला आहे.

त्या ठिकाणी खाजगी कंपनीचा फोटो, सोशल मीडियावर फेक व्हायरल फोटो, भातखळकर अग्रस्थानी – Aaditya Thackeray’s old Worli Came Choo posters gone viral on social media :

सोशल मीडियावर व्हायरल होणारा आदित्य ठाकरेंचा एक फोटो:
मराठी माणसाच्या हक्कासाठी उभी राहिलेली शिवसेना कायम हिंदुत्वासाठी पुढाकार घेत असलेली सगळ्या जगाने पाहिलीय. पण हीच शिवसेना गेल्या काही काळापासून सर्वसमावेशक होऊ पाहतेय का? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. त्याला कारणं अनेक आहेत पण सध्या या संदर्भातील चर्चा अधिक रंगू लागली त्याचं मुख्य कारण आहे, सोशल मीडियावर व्हायरल होणारा आदित्य ठाकरेंचा एक फोटो.

आदित्य ठाकरेंच्या त्या फोटोवरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्यानंतर आमच्या प्रतिनिधीने तिथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी नेमकं सत्य समोर आलं. आदित्य ठाकरेंचा हिरव्या फलकावरील व्हायरल झालेला हा फोटो खोटा आहे. प्रत्यक्षात त्या फलकावर एका कंपनीची जाहिरात आहे, आदित्य ठाकरे यांचा फोटोच नाहीय. कोणीतरी मुद्दामून हा खोडसाळपणा केल्याची शक्यता आहे.आदित्य ठाकरे हे वरळीचे आमदार आहेत. या मतदारसंघात मराठीजनांबरोबर अन्य भाषिक मतदारांचीही संख्या लक्षणीय आहे. यापूर्वी सुद्धा आदित्य ठाकरेच्या बॅनरवरील अन्य भाषेतील मजकुरांची माध्यमांमध्ये बरीच चर्चा झाली होती. सध्या शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सत्तेमध्ये आहे. त्यामुळे शिवसेनेला हिंदुत्वाचा विसर पडल्याचा विरोधकांकडून नेहमी आरोप केला जातो.

वास्तविक ते फोटो १ वर्षा पूर्वीचे: जे विरोधक आता वापरत आहेत आणि त्यात नेहमीप्रमाणे भाजपचे आमदार अतुल भातखळकर अग्रस्थानी आहेत यात काहीच नवं नाही.

Yuvasena

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Aaditya Thackeray’s old Worli Came Choo posters gone viral on social media.

हॅशटॅग्स

#AadityaThackeray(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x